बिहारच्या अररिया जिल्ह्यात एका १८ वर्षाच्या तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारिरीक संबंधातून गर्भवती राहिल्यानंतर तरुणीने आरोपीकडे लग्नासाठी तगदा लावला. वैगातून आरोपीने तरुणीला जवळच्या शेतात बोलावून घेतले आणि गळा आवळून तिची हत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या बांसबाडी गावात सोमवारी एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली. पोलीस तपासात तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी अब्दुल अहद पिता जैनुल याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. सुरुवातीला अब्दुलने उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबूली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे ५५ वर्षीय आरोपीसोबत गेल्या पाच महिन्यापासून प्रेमसंबंध होती. शारिरीक संबंधातून गर्भवती राहिल्यानंतर तरुणीने आरोपीकडे लग्नासाठी हट्ट धरला आणि पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास ती गर्भवती असल्याची बातमी गावकऱ्यांना सांगण्याची धमकी दिली. याला वैतागून आरोपीने तरुणीला जवळच्या शेतात बोलावून घेतले आणि गळा आवळून तिची हत्या केली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.