शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन साइटवरून पडले प्रेमात, मग प्रियकराने अश्लील फोटो व्हायरल करून मोडलं तिचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 13:34 IST

फ्रेन्ड रिक्वेस्ट आणि ऑनलाइन चॅटींगनंतर मजेत त्याला प्रेम नाव दिलं जातं. पण त्याच्या परिणामाबाबत कुणी विचारच करत नाहीत.

अलिकडे सोशल मीडिया साइटवरून तरूण-तरूणी प्रेमात पडण्याचा जणू ट्रेन्ड सुरू आहे. पण या ऑनलाइन जमान्यातील प्रेम केवळ गंमत बनून राहिलं आहे. अशाप्रकारे झालेल्या प्रेमात कधी कुणासोबत काय होईल काहीच सांगता येत नाही. फ्रेन्ड रिक्वेस्ट आणि ऑनलाइन चॅटींगनंतर मजेत त्याला प्रेम नाव दिलं जातं. पण त्याच्या परिणामाबाबत कुणी विचारच करत नाहीत.

अशीच एक घटना बिहारच्या सीतामढीतून समोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झालेल्या प्रेमानंतर प्रेयसीचं लग्न ठरल्याची माहिती मिळताच नाराज प्रियकराने तरूणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे तिचं लग्न मोडलं. तरूणीने फेक आयडी तयार करून तरूणीचा एक अश्लील फोटो फेसबुकवर व्हायरल केला. तरूणाच्या या कृत्यामुळे हैराण झालेल्या तरूणीच्या परिवाराने तरूणाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. (हे पण वाचा : पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन केली पतीची हत्या)

पोलिसात दिलेल्या तक्रारीत तरूणीच्या काकांनी सांगितलं की, आरोपी तरूणाचं त्याच्या पुतणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. याची खबर तरूणीच्या आई-वडिलांना लागली तर त्यांनी घाईघाईत पुतणीचं लग्न दुसऱ्या तरूणासोबत ठरवलं. तरूणीचं लग्न ठरल्याची माहिती मिळताच नाराज तरूणाने तरूणीचे अश्लील फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवले.

या कारणाने तरूणीचं लग्न मोडलं. याबाबत पीडित परिवाराने आपल्या काही नातेवाईकांना सोबत घेऊन आरोपी तरूणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो टाळाटाळ करत होता. असं न करण्याची सूचना त्याला दिली तर त्याने मारहाण केली.

आरोपी तरूण तीन ते चार दिवसांच्या अंतराने फेक फेसबुक आयडीवरून तरूणीचे अश्लील फोटो पोस्ट करतो. तरूणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने परिवारातील लोक चिंतेत आहे. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. तरूणाला लवकरच अटक केली जाईल असा दावा केला जात आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया