शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात झालं पती-पत्नीचं भांडण तर बाइक थांबवून दोघांनी पुलावरून घेतली उडी, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 18:22 IST

दोघेही बाइकवरून चकसाहू रोडवरील कलकलियां पुलावरून जात होते. यावेळी जोडप्यात काही कारणावरून भांडण झालं आणि...

बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका जोडप्याने छोट्याशा वादानंतर खोल पाण्यात उडली घेतली. या घटनेत तरूणाचा मृत्यू झाला तर तरूणीला बचाव दलाने वाचवलं. जीव वाचलेल्या तरूणीने मृत आपला पती असल्याचं सांगितलं. तर आत्महत्येचं कारण पती-पत्नीत सुरू असलेला वाद सांगण्यात येत आहे.

दोघेही बाइकवरून चकसाहू रोडवरील कलकलियां पुलावरून जात होते. यावेळी जोडप्यात काही कारणावरून भांडण झालं आणि बघता बघता दोघांनी पुलावरून खाली खोल पाण्यात उडी घेतली. जवळच असलेल्या मासेमारी करणाऱ्यांनी दोघांनाही पाण्यात उडी घेताना पाहिलं आणि त्यांना वाचवण्यासाठी धावून आले. मात्र, तरूणाचा मृत्यू झाला. तर तरूणीचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलं. (हे पण वाचा : बोबड्या भाषेत ६ वर्षीय मुलीने उलगडलं आईच्या हत्येचं रहस्य, डोळ्यांनी पाहिली होती तिने सगळी घटना)

मृतक तरूण वैशाली जिल्ह्यातील हसनपूर जुनैद गावात राहणारा अविनाश कुमार पटेल आहे. तर तरूणी हरैल गावात राहणारी सोनाक्षी कुमारी आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, दोघांमध्ये काही कारणावरून वाद पेटला होता. यादरम्यान ते कुणासोबत तरी व्हिडीओ कॉलवर बोलत होते आणि शिव्याही देत होते. अशात अचानक दोघांनी पुलावरून खाली पाण्यात उडी घेतली. स्थानिकांनी घटनेची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरूणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. 

दरम्यान, परिसरात चर्चा सुरू आहे की, मृत तरूणाचं आधी एका तरूणीसोबत लग्न झालं होतं आणि हरैल गावात राहणाऱ्या तरूणीसोबत त्याचं प्रेम प्रकरण सुरू होतं. यावरूनच त्यांच्यात वाद सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळावरून बाइक ताब्यात घेतली. पोलिसांनी सांगितलं की, प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि चौकशीनंतर जे समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी