शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Gundaraj: गुंडाराज! देशातील एकमेव कॉलेज, जिथे मुली एके ४७ च्या सावलीत शिकताहेत, आहेत त्रस्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 23:18 IST

मनेरच्या कॉलेमध्ये विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या सर्व पोलिसांकडे एके ४७ रायफली आहेत. या रायफलींच्या संरक्षणात मुली कॉलेजला येत-जात आहेत.

बिहार आणि गुंडाराज काही नवीन नाही. रात्री ९-१० वाजले की या राज्यातून प्रवास करणाऱ्या ट्रेनचे दरवाजे आतून लॉक केले जायचे, असे सांगितले जाते. नितीश कुमार कितीही सुशासनची बाता मारत असले तरी तेथील परिस्थिती दिवसेंदिवर बिघडत आहे. नुकताच एक धक्का देणारा प्रकार समोर आला आहे. तेथील एका शहरातील कॉलेजच्या मुली बंदुकधारी पोलिसांच्या संरक्षणात शिकत आहेत. 

मनेरच्या कॉलेमध्ये विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या सर्व पोलिसांकडे एके ४७ रायफली आहेत. या रायफलींच्या संरक्षणात मुली कॉलेजला येत-जात आहेत. यावरून तुमच्या तेथील काय परिस्थिती असेल ते लक्षात येतेय मणेरमध्ये स्थानिक तरुणांनी कॉलेजमध्ये असा काही हैदोस घातला आहे की, इथल्या 80 टक्के विद्यार्थिनींनी कॉलेजमध्ये येणेच बंद केले आहे. ज्या येत आहेत, त्या देखील जीव मुठीत घेऊन येत आहेत. पालकही मुलींना पाठवत नाहीएत. मणेर पोलिस ठाण्यातील पोलीस फोर्स या कॉलेजच्या बंदोबस्ताला लावण्यात आली आहे. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन नावाच्या खासगी पॅरा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींना बदमाशांचा त्रास होत आहे.

३० जानेवारीपासून या कॉलेजच्या मुलींची मोठ्या प्रमाणावर छेडछाड काढली जात आहे. त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. कॉलेज प्रशासनाने या गावगुंडांची तक्रार केली तेव्हा या गुंडांनी कॉलेजवर हल्ला केला. गोळीबारही केला आहे. मुलींशी असभ्य वर्तनही केले आहे. यानंतर पोलिसांनी कॉलेजला बंधुकधारी पोलिसांचा बंदोबस्त पुरविला आहे. 

पोलिस दिवसभर मुंलींच्या सुरक्षेत गुंतलेले असतात. कॉलेजच्या बाहेर आणि कॉलेजच्या आत पोलिस तैनात आहेत. पोलिसांचा बंदोबस्त कायमच दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिस कॅम्पसवर लक्ष ठेवून आहेत. कॉलेजची वेळ संपल्यानंतरच पोलिस येथून निघून जात आहेत. तसेच तिथे कोणीही विद्यार्थीनी राहिली नाहीय ना याचीही तपासणी केली जात आहे. 

स्थानिक गुंड महाविद्यालयात शिकणाऱ्या मुली आणि मुलांचीही मारहाण करून त्यांची छेड काढतात. यामुळे या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी बाहेरील राज्यांतून आलेले शिक्षकही भितीच्या छायेत आहेत. अद्यापपर्यंत गुन्हेगारांना अटक झालेली नाही, पोलिसांच्या उपस्थितीत अभ्यास केला जात आहे.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी