शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 22:07 IST

Nawada News: या घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तळ ठोकून आहे.

Bihar Crime :बिहारच्या नवादामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील महादलित टोला येथे बुधवारी(दि.18) गावगुंडांनी सुमारे 80 घरांना आग लावली. या घटनेनंतर मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. हे संपूर्ण प्रकरण मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या घटनेत अनेक गुरे जळून ठार झाली आहेत. तसेच, पीडित गावकऱ्यांनी गोळीबार आणि मारहाणीचा आरोपही केला आहे.

ही संपूर्ण घटना जिल्ह्यातील मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देदौर कृष्णा नगरमध्ये घडली. नदीकाठावरील सरकारी जमिनीवर राहणाऱ्या लोकांच्या घरांना आग लावण्यात आली. या घटनेमुळे गावात संतापाची लाट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहोचले आणि अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणत्याही व्यक्तीचा जीव गेला नाही.

या घटनेबाबत पीडित गावकऱ्यांनी आरोप केला की, बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास शेकडो गावगुंड गावात पोहोचले आणि त्यांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. गोळीबाराचा आवाज ऐकून लोक घाबरले. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. अनेक गावकऱ्यांना मारहाण करण्यात आली आणि 80-85 घरांना आगही लावली.

वर्षभरापूर्वीही गोळीबार झाला होताया आगीत अनेक गुरे जळून खाक झाल्याचे पीडित गावकऱ्यांनी सांगितले. घरातील साहित्यही पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आता लोकांना खाण्यापिण्याची, निवाऱ्याची समस्या भेडसावत आहे. अचानक घडलेल्या प्रकारामुळे लोकांना काहीच समजले नाही. या घटनेत अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोळीबाराची घटना घडली असून पोलिसांनी याकडे लक्ष दिले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीfireआग