सुशांत राजपूत प्रकरणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाला आज अटक केलीआहे. तिच्या अटकेनंतर रियाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात येईल. सायंकाळी पाचच्या सुमारास वैद्यकीय तपासणी होईल. एनसीबी कार्यालयात सध्या रियाची तिसर्या दिवशी चौकशी केली जात आहे. रियाचा भाऊ शोविक आधीपासूनच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अटकेत आहे. एनसीबीने एनडीपीएस ऍक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे. याआधी एनसीबीने रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे. सुशांत सिंग राजपूत यांचे वडील के के सिंह यांनी डॉ. सुजैन वॉकरविरोधात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्याच्या वडिलांनी डॉक्टरविरूद्ध मेडिकल कौन्सिलकडे तक्रार केली आहे. सुजैन वॉकर हा सुशांतचा थेरपिस्ट होता. सुशांतच्या मानसिक आजारावर त्यांनी जबाब दिला आहे आणि अभिनेत्याला बायपोलर डिसऑर्डर असल्याचीही माहिती दिली होती.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार
मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन
वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!
खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण
रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत