शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

NCB च्या जाळ्यात अडकला सर्वात मोठा मासा, 'Pablo of drug word' नावाने प्रसिद्ध

By पूनम अपराज | Updated: January 25, 2021 14:50 IST

Drugs Case : एनसीबीने केलेल्या या अटकेनंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग्सच्या धंद्याला खीळ बसबसली आहे. 

ठळक मुद्देरायगड येथून भुजवालाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एनसीबीने अटक केलेला आरिफ सर्वात मोठा ड्रग डीलर आहे.  'Pablo of drug word' नावाने तो प्रसिद्ध आहे. चिंकूला २० जानेवारीला घणसोली येथील एनसीबीने अटक केली. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक आहे. तसेच चिंकू दाऊदचा जवळचा हस्तक असल्याची माहिती मिळत आहे. 

ड्रग्स प्रकरणी एनसीबीला आणखी एक मोठं यश मिळालं असून आरिफ भुजवालाला अटक केली आहे. रायगड येथून भुजवालाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एनसीबीने अटक केलेला आरिफ सर्वात मोठा ड्रग डीलर आहे.  'Pablo of drug word' नावाने तो प्रसिद्ध आहे. एनसीबीने केलेल्या या अटकेनंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग्सच्या धंद्याला खीळ बसबसली आहे. 

 

आरिफ भुजवाला हा दाऊदचा भाऊ अनीश इब्राहिमचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे. आरिफने ड्रग्सच्या माध्यमातून खूप पैसा कमावला. आरिफजवळ १०० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. या संपत्तीत महागड्या गाड्या, फ्लॅट्स आणि प्लॉट्सचा समावेश आहे. याआधी आरिफला अटक करण्यासाठी एनसीबीने त्याच्या लॅबवर छापेमारी केली होती, मात्र आरिफ तेथून फरार झाला होता. आता एनसीबीच्या जाळ्यात आरिफ आला असून त्याच्याकडील कोट्यावधी रुपयांचा अमली पदार्थाचा साठा एनसीबीला सापडला आहे. आरिफ हा चिंकू पठाणचा पार्टनर आहे. चिंकूला २० जानेवारीला घणसोली येथील एनसीबीने अटक केली. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक आहे. तसेच चिंकू दाऊदचा जवळचा हस्तक असल्याची माहिती मिळत आहे. 

 

असं सांगितलं जात आहे की, आरिफ अलीकडेच दुबई येथे जाऊन आला आहे. त्याच्या दुबई ट्रिप देखील एनसीबीच्या रडारवर होती. आरिफ एक ड्रग लॅब चालवत होता. जेथे मेफेड्रोन, मेथमफेटामाईन आणि एफेड्रिन अशा सिंथेटिक ड्रग्स एका फ्लॅटमध्ये बनवले जात होते. हा फ्लॅट दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरातील नूर मंजिल इमारतीत होता. मागच्या बुधवारी सकाळी मिळालेल्या माहितीवरून एनसीबीच्या पथकाने गँगस्टर आणि ड्रग डीलर चिंकू पठाणला अटक केली. त्याचप्रमाणे एनसीबीने चिंकूचा साथीदार जाकिर हुसेन फजल हक शेखला देखील बेड्या ठोकल्या. 

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोArrestअटकMumbaiमुंबईDrugsअमली पदार्थDawood Ibrahimदाऊद इब्राहिमRaigadरायगड