शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
3
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
4
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
5
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
6
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
7
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
8
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
9
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
10
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
11
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
12
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
13
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
14
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
15
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
16
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
17
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
18
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
19
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 23:31 IST

Baba Siddiqui murder case Big news: बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रात्री मुंबईत तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सिद्दीकी यांच्या पोटात आणि छातीत गोळी लागली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. या हत्येमागचा मास्टरमाईंड झिशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. लवकरच लॉरेन्स बिश्नोईच्या भावासारखेच झिशानला भारतात आणले जाण्याची शक्यता आहे. झिशानला कॅनडात अटक झाल्याचे मुंबई पोलिसांनीही स्पष्ट केले आहे. 

बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रात्री मुंबईत तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सिद्दीकी यांच्या पोटात आणि छातीत गोळी लागली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी करनैल सिंग आणि धर्मराज कश्यप नावाच्या दोघांना लगेचच अटक केली होती. तर पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील नकोदर येथील आकार गावचा रहिवासी असलेला झिशान अख्तरचा शोध सुरु होता. 

अख्तर हा बाहेरून या शूटर्सना सूचना देत होता. झिशाननेच बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाची माहिती शूटर्सना दिली होती. यासोबतच मोहम्मद झिशानने आरोपींसाठी भाड्याने खोली घेण्यासोबत अनेक गोष्टींमध्ये मदत केली होती. सिद्दीकी हत्येवेळी तो परदेशात असल्याचे सांगितले जात होते. तिथूनच तो मारेकऱ्यांना सूचना देत होता. लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याला देखील कॅनडासोबतच्या प्रत्यार्पण करारानुसार भारतात आणण्यात आले आहे. 

झिशान अख्तर हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी संबंधित आहे. तो पुण्यातील गँगस्टर सौरभ महाकालशीही संबंधित होता. सौरभ महाकाल अनेक वेळा पंजाबमधील त्याच्या घरी येऊन राहिला होता. मुंबई पोलिसांनी बॉलीवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना पाठवलेल्या धमकीच्या पत्राबद्दल सौरभची चौकशी केली होती. पंजाबमध्ये झिशान अख्तरवर खून, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी थेट संपर्कात होता. 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCanadaकॅनडा