शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

दिल्ली दंगलीतील हिंदू आरोपींबाबत मोठा गौप्यस्फोट, समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 14:23 IST

Delhi riots : गेल्यावर्षी देशभरात सीएए कायद्याविरोधात आंदोलन सुरू असताना फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये मोठी दंगल उसळली होती. या दंगलीत अनेकजण मारले गेले होते.

नवी दिल्ली - गेल्यावर्षी देशभरात सीएए कायद्याविरोधात आंदोलन सुरू असताना फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये मोठी दंगल उसळली होती. या दंगलीत अनेकजण मारले गेले होते. तर शेकडो जण जखमी झाले होते. दरम्यान, या दंगली प्रकरणी अटक करून तिहार तुरुंगात ठेवण्यात आलेल्या हिंदू आरोपींबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Big shocking information about Hindu accused in Delhi riots, shocking information came to light)दिल्ली दंगली प्रकरणी तिहार तुरुंगात असलेल्या हिंदू आरोपींना तुरुंगातच जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट झाला आहे. या आरोपींना तुरुंगामध्येच पारा पाजून ठार मारण्याचे कारस्थान उघड झाले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिलेल्या माहितीनुसार  तिहार तुरुंगात बंद असलेला शाहिद आणि तुरुंगाबाहेर असलेल्या अस्लमने हे कारस्थान रचले होते. हे कटकारस्थान तडीस नेण्यासाठी अस्लमने तुरुंगात असलेल्या शाहीदकडे पारा पोहोचवला होता. 

 दिल्लीतील जातीय दंगलीदरम्यान मौजपूर पुलिया आणि शिवविहार पुलियया जवळ हत्या करणाऱ्या आरोपींची तुरुंगातच हत्या करण्याचा कट आखण्यात आला होता. या कटकारस्थानाची कुणकूण लागताच स्पेशल सेलने टेक्निकल सर्व्हिलान्स ठेवण्यास सुरुवात केली आणि हा कट उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी तिहार तुरुंगातून कटासाठी आणण्यात आलेला पारा जप्त केला आहे. तसेच दोन्ही आरोपींनाही अटक केली आहे.  गेल्या वर्षी २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील उत्तर-पूर्व जिल्ह्यातील जाफराबाद परिसरामध्ये दुपारच्या वेळी अचानक दंगल भडकली होती. या दंगलीचे लोळ संपूर्ण जिल्ह्यात पसरले होते. या दंगलीमध्ये अधिकृत आकडेवारीनुसार ५३ जणांचा मृत्यू झाला होता. आयबीचे अधिकारी अंकित आणि दिल्ली पोलिसांचे एक हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा या दंगलीत मृत्यू झाला होता. 

 या दंगली प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत एकूण ७५१ एफआयआर दाखल केल्या आहेत. दिल्लीतील कडकडडूमा कोर्टात स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. हिंसेतील मास्टरमाइंड असलेला आपचा माजी नगरसेवक ताहीर हुसेन आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक इशरत जहाँ तिहार तुरुंगात बंद आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस