शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: चिनी अ‍ॅपच्या माध्यमातून १५ दिवसांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष, २५० कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 10:31 IST

Rs 250 crore scam: कमी वेळात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष हे फसवणुकीचे कारण ठरू शकते हे माहिती असूनही अनेक लोक या दामदुप्पट परताव्याच्या आमिषाला बळी पडतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

देहराडून/नोएडा - कमी वेळात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष हे फसवणुकीचे कारण ठरू शकते हे माहिती असूनही अनेक लोक या दामदुप्पट परताव्याच्या आमिषाला बळी पडतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तराखंड एसटीएफने एका मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. एसटीएफने २५० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी उत्तर प्रदेशमधील नोएडा येथून एका आरोपीला अटक केली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे ही फसवणूक केवळ चार महिन्यांमध्ये करण्यात आली. चीनमधील स्टार्टअप योजनेंतर्गत तयार झालेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली. चीनच्या स्टार्टअप योजनेमधून पॉवर बँक अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. हे अ‍ॅप भारतामध्ये आतापर्यंत ५० लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांना १५ दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले जाते.  त्या माध्यमातून केवळ चार महिन्यांमध्ये या ठकसेनांनी २५० कोटी रुपयांचा चुना लोकांना लावला. ही फसवणूक करणारे बदमाश लोकांना पॉवर बँक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगत होते. जेव्हा लोकांकडून हे अ‍ॅप डाऊनलोड केले जायचे तेव्हा त्यांना १५ दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले जायचे. धक्कादायक बाब म्हणजे हा धंदा सुमारे चार महिने चालला होता. मात्र पोलिसांना याची खबर नव्हती. अखेर उत्तराखंडमधील हरिद्वार येथील एका व्यक्तीने केलेल्या तक्रारीनंतर या घटनेचा उलगडा झाला.  तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले की, पॉवर बँक अ‍ॅप नावाच्या अ‍ॅपमध्ये १५ दिवसांत पैसे दुप्पट करण्यासाठी त्यांनी दोन वेळा ९३ हजार ७२ रुपये जमा केले होते. मात्र पैसे दुप्पट झाले नाहीत. त्यानंतर मी पोलिसांत तक्रार केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हे पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा झाल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांची तपासणी केली असता तब्ब्ल २५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले.

या प्रकरणी उत्तराखंड एसटीएफने तपास करून नोएडा येथून पवन पांडेय या एका आरोपीला अटक केली. आरोपीकडून तब्बल ५९२ सिमकार्ड, १९ लॅपटॉप आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले. एसटीएफने केलेल्या तपासात ही रक्कम क्रिप्टोकरंसीमध्ये बदलून परदेशात पाठवली जात असल्याचे समोर आले. दरम्यान, या प्रकरणाची माहिती आयबी आणि रॉ या संस्थांनाही देण्यात आली आहे.  

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीchinaचीनcyber crimeसायबर क्राइम