शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचं घबाड! ज्युनिअर ऑडिटर निघाला धनकुबेर; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 10:09 IST

ज्युनिअर ऑडिटर रमेश हिंगोरानी यांच्या घरावर लोकायुक्त पथकाने छापा टाकून कोट्यवधींची मालमत्ता, कॅश आणि आलिशान वाहनं जप्त केली आहेत.

मध्य प्रदेशातील तंत्रशिक्षण विभागाचे ज्युनिअर ऑडिटर रमेश हिंगोरानी यांच्या घरावर लोकायुक्त पथकाने छापा टाकून कोट्यवधींची मालमत्ता, कॅश आणि आलिशान वाहनं जप्त केली आहेत. रोख रक्कम एवढी होती की, ती मोजण्यासाठी मशीन मागवाव्या लागल्या. हिंगोरानी यांच्यावर सरकारी जमीन हडप केल्याचा गंभीर आरोपही आहे. लोकायुक्त पथकाने रमेश हिंगोरानी यांचा भोपाळमधील बैरागढ येथील बंगला, त्यांचं घर, गांधीनगरमधील उच्च माध्यमिक विद्यालय, किरण प्रेरणा शाळा आणि मॅरेज गार्डन या सहा ठिकाणी छापे टाकले. 

आतापर्यंतच्या तपासात तब्बल ७० लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, १२ लाख रुपयांहून अधिक रोख आणि ४ आलिशान वाहनं जप्त करण्यात आली आहेत. पैसे मोजण्यासाठी मशीनची गरज होती. छाप्यादरम्यान, लोकायुक्त पथकाने हिंगोरानी यांच्याकडून क्रेटा आणि स्कॉर्पिओसारख्या चार आलिशान कार, १०१४ ग्रॅम सोनं आणि १०२१ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. याशिवाय १२,१७,९५० रुपयांची रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रंही जप्त करण्यात आली असून, त्यांची तपासणी सुरू आहे. 

गांधीनगर येथील हिंगोरानी यांच्या शाळेत छापा टाकला असता देशी बनावटीचे पिस्तूलही जप्त करण्यात आले, त्यानंतर गांधीनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांचा मुलगा निलेश हिंगोरानी याच्यावर बेकायदेशीर हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश हिंगोरानी आणि त्यांची मुलं योगेश आणि निलेश यांच्यावरही कोट्यवधींच्या सरकारी जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप आहे.

हिंगोरानी कुटुंब 'लक्ष्मी देवी विकयोमल सराफा एज्युकेशन सोसायटी' अंतर्गत तीन शाळा चालवत होतं, त्यात त्यांच्या मुलांना कोणत्याही पात्रतेशिवाय भरघोस पगारावर नियुक्त करण्यात आलं आहे. त्याच्याविरुद्ध सरकारी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणीही चौकशी सुरू आहे. हिंगोरानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर नोंदवलेली मालमत्ता आणि खर्च हे उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा खूप जास्त असल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशMonkeyमाकड