शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

तोतया एनसीबी अधिकाऱ्यांच्या दबावाखाली येऊन भोजपूरी अभिनेत्रीने संपवले आयुष्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 21:36 IST

Suicide Case : दोघांना अटक, मित्रानेच रचला कट

मुंबई : हुक्का पार्लरमध्ये पार्टी सुरु असताना अचानक एनसीबीचा छापा मारल्याचे सांगत एका भोजपुरी अभिनेत्रीला ताब्यात घेतले. पुढे, कारवाईच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी २० लाखांच्या खंडणीसाठी दबाव वाढला. याच दबावात अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना जोगेश्वरीत घडली. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी एनसीबी अधिकारी  असल्याचा बनाव करणाऱ्या दुकलीला अटक करण्यात आली आहे. मित्रानेच हा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून त्याचा शोध सुरु आहे.     

सूरज परदेशी आणि प्रवीण वळिंबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. परदेशी हा बांधकाम कंत्राटदार आहे तर, वळिंबे हा खासगी नोकरी करत असून आसनगाव येथील रहिवासी आहे. अभिनेत्री जोगेश्वरी येथील हिल पार्कमध्ये  भाड्याने राहण्यास होती. पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० डिसेंबर रोजी अभिनेत्री आपल्या मित्र मैत्रिणीसह मुंबईतल्या एका पंच तारांकित हॉटेल मध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी करत होती. त्यादरम्यान या दुकलीने एनसीबीचा छापा पडल्याचा बनाव करत, अभिनेत्रीला ताब्यात घेतले. कारवाई न करण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केली. पुढे संबंधित रक्कम लवकरात लवकर मिळण्यासाठी दबाव वाढला. याच दबावाला कंटाळून अभिनेत्रीने २३ तारखेला जोगेश्वरी येथील हिल पार्क परिसरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती मिळताच, अंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अभिनेत्रीला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. मैत्रीणीच्या चौकशीत एनसीबी अधिकाऱ्याची माहिती समोर येताच अंबोली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूक, गुन्हेगारी कट, खंडणी सारख्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली आहे.

मित्रानेच रचला कट ..अभिनेत्रीचा मित्र अझीम काझी आरोपींच्या संपर्कात होता. त्यानेच अभिनेत्रीकडून पैसे उकळण्यासाठी कट रचल्याचे समोर येत आहे. काझी पसार झाला असून त्याच्यासह त्याच्या साथीदाराचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :ArrestअटकDeathमृत्यूMumbaiमुंबईPoliceपोलिसNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो