शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

Crime News: भरतपूरमधून अपहरण अन् भिवानीमध्ये खून! गाडीत आढळले जळालेले सांगाडे, जाणून घ्या प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 14:41 IST

Crime News: दोन तरुणांना गौ तस्करीच्या संशयात हत्या करुन जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Crime News: हरियाणातील भिवानीमध्ये गुरुवारी जळून खाक झालेल्या बोलेरो गाडीत दोन सांगाडे सापडल्याने हरियाणापासून राजस्थानपर्यंत एकच खळबळ उडाली. मृत दोन्ही राजस्थानमधील भरतपूर येथील रहिवासी आहेत. दोघांचे भरतपूर येथून अपहरण करुन भिवानी येथे हत्या केल्याचा आरोप आहे. मृतांच्या नातेवाईकांनी बजरंग दलाच्या 5 कार्यकर्त्यांवर अपहरण आणि हत्येचा आरोप केला आहे. यामध्ये मोनू मानेसरच्या नावाचाही समावेश आहे. हे संपूर्ण प्रकरण गौ तस्करीशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी यावर कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

16 फेब्रुवारी रोजी हरियाणातील भिवानी येथील बरवस गावाजवळ जळालेल्या बोलेरोमध्ये दोन सांगाडे सापडले होते. नसीर (25) आणि जुनैद (35) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही राजस्थानमधील भरतपूर येथील रहिवासी आहेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भरतपूर येथून दोघांचे अपहरण करुन हत्या केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. भरतपूरपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या भिवानी येथील लोहारू येथे दोघांचे मृतदेह सापडले. जुनैदवर गौ तस्करीचे 5 गुन्हे दाखल आहेत. तर, नसीरचा कुठल्याही गुन्ह्याशी संबंध नाही.

मृताच्या चुलत भावाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोनू मानेसर, अनिल, श्रीकांत, रिंकू सैनी, लोकेश सिंगला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व बजरंग दलाचे कार्यकर्ते असून स्वतःला गोरक्षक म्हणवतात. मृताचा चुलत भाऊ खालिद याने बुधवारी गोपाळगड पोलीस ठाण्यात दोन जणांचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. खालिदच्या तक्रारीनुसार, त्याचे दोन चुलत भाऊ जुनैद आणि नसीर हरियाणातील फिरोजपूर येथे काही कामासाठी निघाले होते.

यादरम्यान त्यांचे अपहरण आणि हत्या झाली. तो आपल्या कुटुंबीयांसह गोपालगडमधील पिरुका जंगलात भावाच्या शोधासाठी पोहोचला तेव्हा त्याला जळालेली कार आढळली आणि त्यात दोघांचे जळून खाक झालेले मृतदेह होते. हरियाणातील रहिवासी अनिल, श्रीकांत, रिंकू सैनी, लोकेश सिंगला, मोनू हे बोलेरो कारमध्ये बसलेल्या दोघांशी भांडत असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितल्याचे खालिदने पोलिसांना सांगितले. 

पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली?याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 143, 365, 367, 368 अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. या प्रकरणी अर्धा डझन जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणाचा गाईच्या तस्करीशी संबंध आहे की नाही, हे तपासानंतरच कळेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या प्रकरणावर शोक व्यक्त करत पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.  

टॅग्स :HaryanaहरयाणाRajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीMuslimमुस्लीम