शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Nupur Sharma : नुपूर शर्मा यांना भिवंडी पोलिसांनी पाठवलं समन्स, जबाब नोंदवण्यास बोलावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 19:46 IST

Nupur Sharma : नुपूर शर्मा यांना आता मुंबईतील भिवंडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी समन्स बजावले असून, १३ जून रोजी जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

ठाणे : मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. हा वाद वाढल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आधी निलंबनाची कारवाई केली आणि आता विविध पोलीस ठाण्याचे पोलीस नोंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवत आहेत. नुपूर शर्मा यांना आता मुंबईतील भिवंडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी समन्स बजावले असून, १३ जून रोजी जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

मुंबईतील भिवंडीपोलिसांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना समन्स बजावून त्यांचे जबाब नोंदवण्यास सांगितले आहे. भिवंडी पोलिसांनी नुपूर शर्मा यांना १३ जून आणि नवीन जिंदाल यांना २५ जूनला हजर राहण्यास सांगितले आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी दोन्ही नेत्यांना समन्स बजावले आहे.

यापूर्वी मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनीही समन्स बजावले होते. नुपूर शर्माला पायधुनी पोलिसांनी 25 जूनला तिचा जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले होते. रझा अकादमीच्या तक्रारीवरून मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी रझा अकादमीने नुपूर शर्मा यांच्याविरोधात तक्रार दिली होती.मुंब्रा पोलिसांनी २२ जूनला समन्स बजावलेप्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नुपूर शर्मा यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध ठाणे, मुंबई येथेही गुन्हा दाखल केला आहे. गुफरान खान नावाच्या शिक्षकाच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध भादंवि कलम १५३ अ आणि ब, २९५ अ, २९८ आणि ५०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मुंब्रा पोलिसांनी नुपूर शर्माला 22 जून रोजी समन्स बजावले आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीPoliceपोलिसBJPभाजपा