शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 02:07 IST

लग्नानंतर पाच महिन्यांतच पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेने माहेरहून पाच लाख आणावेत, यासाठी विवाहितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिने पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी : लग्नानंतर पाच महिन्यांतच पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेने माहेरहून पाच लाख आणावेत, यासाठी विवाहितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिने पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पती राजेश भालेराव, सासू इंदुबाई भालेराव, सासरा सुदाम भालेराव, दीर पांडुरंग भालेराव, पोपट भालेराव, नणंद सीमा कांबळे अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोनगाव येथील करु णा वाघमारे (२१) हिचा विवाह १९ मे २०१९ रोजी पुणे जिल्ह्यातील मौजे कामशेत येथील राजेश याच्याशी झाला. विवाहानंतर करुणा पाच परतवणीसाठी माहेरी आली होती.त्यावेळी नणंद सीमा हिने मोबाइलवरून संपर्कसाधून तू सासरी येताना तुझ्या पतीला अ‍ॅम्ब्युलन्स घ्यायची आहे, त्यासाठी वडिलांकडून पाच लाख घेऊन ये, असे सांगितले. त्यावर करु णा हिने माझ्या वडिलांच्या आजारपणावर खूपच पैसे खर्च झाले आहेत. त्यामुळे मी पैसे आणू शकत नाही, असे सांगितले. त्यानंतर, करु णा सासरी नांदण्यास गेली. दोन महिन्यांनी करु णाच्या आईवडिलांनी तिला पंचमी सणासाठी २ आॅगस्ट रोजी माहेरी आणले. १२ आॅगस्ट रोजी करु णा हिच्या पतीने कामशेत पोलीस ठाण्यात करुणा व तिच्या आईवडिलांच्या विरोधात तक्र ार देऊन स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी करुणाचा भाऊ अक्षय वाघमारे हा सासरच्या मंडळींची समजूत काढण्यासाठी कामशेत येथे गेला असता, त्याच्याकडेही पाच लाखांची मागणी केली. त्यानंतर, पाच लाख देण्याची ऐपत नसल्याचे करु णा हिने वेळोवेळी सांगितल्याने पती व सासरच्या मंडळीने शिवीगाळ व दमदाटी करून करूणा हिला मारहाणही केली. त्यामुळे छळाला कंटाळून अखेर करु णा हिने भिवंडीतील माहेर गाठले व पती राजेश याच्यासह सासू, सासरा, दीर, नणंद आदी सहा जणांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, सासरच्या मंडळींविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी