Bhima Koregaon Case : वरावरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच  

By पूनम अपराज | Published: November 12, 2020 09:24 PM2020-11-12T21:24:11+5:302020-11-12T21:27:04+5:30

Bhima Koregaon Case/ Elgar Parishad and Varavara Rao : उच्च न्यायालयाने 16 नोव्हेंबरपर्यंत त्याचे वैद्यकीय अहवाल मागविले आहेत.

Bhima Koregaon Case : Varavara Rao is not relieved by the bombay High Court | Bhima Koregaon Case : वरावरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच  

Bhima Koregaon Case : वरावरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच  

Next
ठळक मुद्देएनआयए आणि तळोजा तुरूंग प्रशासनास कुटूंब व डॉक्टरांसमवेत व्हिडिओ कन्सल्टेशन करण्याची व्यवस्था करण्यास सांगितले.

मुंबई - भीमा-कोरेगाव/ शहरी नक्षलवाद व एल्गार परिषद प्रकरणी आरोपी असलेले ज्येष्ठ कवी वरावरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जुलै महिन्यात उच्च न्यायालयानेराज्य सरकार व एनआयएला दिले होते. राव यांच्या पत्नीने त्यांची सुटका करावी यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर वरवरा राव यांना मुंबईउच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. आज उच्च न्यायालयाकडून  हे प्रकरण १७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केले आहे. तसेच एनआयए आणि तळोजा तुरूंग प्रशासनास कुटूंब व डॉक्टरांसमवेत व्हिडिओ कन्सल्टेशन करण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. उच्च न्यायालयाने 16 नोव्हेंबरपर्यंत त्याचे वैद्यकीय अहवाल मागविले आहेत.

जुलै महिन्यात राव यांची प्रकृती खालावली असून ते मृत्यूशय्येवर आहेत, असे राव यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. ८१ वर्षांचे राव यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राव यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान  झाले होते. त्यांना अन्य आजार असल्याने त्यांची प्रकृती खालावली असून राव यांच्या प्रकृतीची माहिती देण्याचे निर्देश देत न्यायालयाने राव यांचे कुटुंबिय त्यांना दुरून भेटू शकते का? अशी विचारणा राज्य सरकार व एनआयएकडे केली होती. 

 

Web Title: Bhima Koregaon Case : Varavara Rao is not relieved by the bombay High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.