शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांना कोर्टाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 16:48 IST

पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चार आठवड्याच्या संरक्षणाची मुदत 11 नोव्हेंबर रोजी संपली आहे. नवलखा यांनी याआधी उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती.

पुणे - भीमा कोरेगाव प्रकरणी पुणेसत्र न्यायालयाने गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळला आहे. त्यामुळे नवलखा यांना कोर्टाने दणका दिला आहे. एल्गार आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चार आठवड्याच्या संरक्षणाची मुदत 11 नोव्हेंबर रोजी संपली आहे. त्यामुळे नवलखा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज युक्तिवाद पार पडला आहे. मात्र, पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

बचाव पक्षाचे वकील युग चौधरी हा अर्ज दाखल केला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती.सर्वोच्च न्यायालयाने नवलखा यांना दिलेल्या चार आठवड्याच्या संरक्षणाची मुदत 11 नोव्हेंबर रोजी म्हणजेच काल संपली आहे.  कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण व माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले ज्येष्ठ नागरी अधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मात्र, उच्च न्यायालयाने या अर्जावर सुनावणी घेण्यास नकार देत नवलखा यांना विशेष न्यायालयात अर्ज करण्याचे निर्देश दिले होते.सर्वोच्च न्यायालयाने 15 ऑक्टोबर रोजी नवलखा यांना चार आठवडे अटकेपासून संरक्षण देत संबंधित न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करण्याची मुभा दिली होती. ही मुदत संपत आल्याने नवलखा यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या याचिकेवरील सुनावणी न्या. प्रकाश नाईक यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे होती. आरोपीने विशेष न्यायालयात जामीन अर्ज न करता थेट उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्यामुळे आरोपीने आधी विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल करावा, असे स्पष्ट करीत न्या. नाईक यांनी सुनावणी घेण्यास नकार दिला होता.

नवलखा यांनी याआधी उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने 13 ऑक्टोबर रोजी याचिका फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयाला नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार देत त्यांना अटकेपासून चार आठवडे संरक्षण दिले. नवलखा यांनी आपल्याला या केसमध्ये नाहक गोवल्याचे अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे. त्यांच्यावर यूएपीए, दहशतवादासंबंधी, भारतीय दंडसंहितेअंतर्गत पुणे शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यात एल्गार परिषदेची सभा झाली. या सभेदरम्यान दिलेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथे जातीय दंगल उसळली, असा पोलिसांचा दावा आहे.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणेSessions Courtसत्र न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय