शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जुहू चौपाटीवर विकायचा भेळ; सायबर गुन्ह्यातून जमवली कोटींची माया, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By पूनम अपराज | Updated: February 19, 2021 20:01 IST

Cyber crime master Arrested : पुखराजने घाटकोपर येथील एका मॉलमध्ये जाऊन ४० हजारांचे ४ आणि १० हजारचा १ असे पाच मोबाईल खरेदी केले. 

ठळक मुद्दे मुंबई पोलिसांचे पथक जामतारातीळ बद्रीमंडलच्या गावात धडकले आणि त्यांनी बद्रीमंडलला बेड्या ठोकून डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात घेऊन आले.

पूनम अपराज

जुहू चौपाटीवर एकेकाळी वडिलांसोबत भेळ विकणारा, चौथी शिकलेल्या बद्रीमंडलला (२५)  डी. बी. मार्ग पोलिसांनी जामतारा येथून बेड्या ठोकल्या आहेत. त्याने पेटीएमद्वारे लॅमिंटन रोडवरील व्यापाऱ्याला लाखोंचा गंडा घातला होता. झारखंडमधील जामतारा जिल्ह्यात या आरोपीची अमाप करोडोची संपत्ती असल्याचे पोलीस तपासात आढळून आले. बद्रीमंडल हा चौथी शिकलेला आरोपी सायबर क्राईममधला मास्टरमाइंड आहे. जामतारा जिल्ह्यातील तरुणांना यानेच सायबर क्राईमचे धडे गिरवायला शिकवले अशी पोलिसांनी माहिती दिली. 

अंधेरीतील जुहू चौपाटीवर वडिलांसोबत भेळ विकणारा बद्रीमंडल. काही दिवसांनी आपल्या मूळगावी जामतारा येथे गेला. चौथी शिकलेले केवळ स्वतःच्या नावाची सही कारण्यापुरतं लिहिता येतं, तरीदेखील सायबर क्राईम करण्यात एक नंबर असलेल्या बद्रीमंडलने डिसेंबर २०१९ मध्ये ऑटो स्पेअर पार्ट विकणारे व्यवसायिक आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या नागरिकाला केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली फसवा कॉल केला आणि टीम व्युव्हर ऍपच्या माध्यमातून त्याने व्यवसायिकाचा ओटीपी मिळवून त्यांचा मोबाईल ऍक्सेस आपल्या मोबाईलवर घेऊन १ लाख ७० हजारांना गंडा घातला. ताबडतोब आलेले पैसे बद्रीमंडलने राजस्थानच्या अरविंद पुरोहितला पाठवले आणि अरविंदने मुंबईत सुतार काम करणाऱ्या पुखराजला ते पैसे वळते केले. पुखराजने घाटकोपर येथील एका मॉलमध्ये जाऊन ४० हजारांचे ४ आणि १० हजारचा १ असे पाच मोबाईल खरेदी केले. 

राजस्थानहून आलेले संपत सुतार, करसी सुतार आणि पुखराज सुतार यांना डी. बी. मार्ग पोलिसांनी जानेवारी २०२० ला जेरबंद केलं. त्यांच्याकडून ७४ मोबाईल हस्तगत करण्यात आले आणि वरळी परिसरात हे वास्तव्य करत होते. सुतार बंधू हे मोबाईल खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये गेले होते. त्यामुळेच बद्रीमंडलचे बिंग फुटले. या प्रकरणात अरविंद पुरोहित हा आरोपी अद्याप फरार आहे. 

 

ब्लॅकआऊट करुन सराईत दरोडेखोरांचा दरोडा, सीसीटीव्ही फुटेजवरही मारला डल्ला

 

मुख्य आरोपी बद्रीमंडल हा सायबर क्राईममध्ये कुर्ला, एमआयडीसी आणि डी. बी. मार्ग पोलिसांसाठी वॉन्टेड आरोपी होता. अखेर त्याचा ठावठिकाणा लागला. नंतर मुंबई पोलिसांचे पथक जामतारातीळ बद्रीमंडलच्या गावात धडकले आणि त्यांनी बद्रीमंडलला बेड्या ठोकून डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात घेऊन आले.

 

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकावर जामतारा गावात बद्रीमंडलला पकडताना गावकऱ्यांनी किरकोळ दगडफेक केली, सुदैवाने पोलिसांना दुखापत झाली नाही. मात्र, बद्रीमंडलला पकडणं खूप अवघड होतं असं डी. बी, मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजा बिडकर आणि पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं. बद्रीमंडल याने सायबर क्राईम करून करोडोची माया जमवली. त्याच्याकडे स्पोर्ट युटिलिटी व्हेहिकल (एसयूव्ही) गाडी आणि बुलेट असून गावात आलिशान घर आहे. याआधी देखील बद्रीमंडलला कफपरेड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटून पुन्हा सायबर क्राईम करत होता. एकूण २५ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. 

 

जामताराची सायबर गुन्ह्यांचं हब म्हणून कुप्रसिद्ध 

झारखंडमधील संथाल परगणा परिसरातील जामतारा हे गाव, रांचीपासून जवळपास २५० किमी अंतरावर आहे. जामतारा म्हणजे ऑनलाइन फसवणूक, सायबर क्राईम आणि फिशिंगशी संबंधित लोकांचा अड्डा आहे. जामतारा जिल्ह्यात जवळपास ११६१ गावं आहेत. शेती हेच प्रमुख उत्पन्नाचं साधन असलेल्या या परिसरातील शेती ही मुख्यत: पावसावर अवलंबून आहे. येथे जास्तीत जास्त भाताचं पीक घेतलं जातं. भारतातील जेवढे काही सायबर गुन्हे होतात त्यापैकी सर्वाधिक गुन्हे हे झारखंडमधील जामताराशी निगडित असतात.बॉक्साईटच्या खाणींसाठीही हा जिल्हा ओळखला जायचा. पण सध्या या जिल्ह्याची ओळख ही ऑनलाईन ठगांचा जिल्हा अशीच बनली आहे.

 

फिशिंग काय आहे?फिशिंग म्हणजे युजरनेम, पासवर्ड, क्रेडिट कार्ड डीटेल्स, बँक खात्याचे डीटेल्स यासारखी गुप्त माहिती अवैध मार्गानं मिळवणे. या मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग करुन संबंधिताच्या खात्यावरुन पैसे गायब केले जातात.  

टॅग्स :Arrestअटकcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसJharkhandझारखंड