शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

लपूनछपून पॉर्न पाहत असाल तर सावधान; अशा प्रकारे सापडू शकता हॅकर्सच्या तावडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 15:15 IST

अशा प्रकारचे सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत असून अशा क्राईमपासून सावध राहणं गरजेचं आहे.

ठळक मुद्देएखाद्याला पॉर्न पाहाणं तुम्हाला चांगलचं महागात पडू शकतं.काही हॅकर्स तरुण पॉर्न पाहात असताना त्यांना त्या वेबसाइटच्या माध्यमातून छुप्या पद्धतीनं रेकॉर्ड करतात.कोणत्या हॅकर्सच्या मेलला बळी पडू नये असंही आवाहन सायबर सेलकडून वारंवार कऱण्यात आलं आहे.

मुंबई - अनेकांना लपून, एकटं असताना पॉर्न पाहण्याची सवय असते. तसेच तुम्हाला लपूनछपून पॉर्न पाहण्याची सवय असेल तर सावध व्हा. कारण लपून पॉर्न पाहणाऱ्यांना हॅकर्स आपल्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करत असून पैशांची मागणी करत आहेत. अशा प्रकारचे सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत असून अशा क्राईमपासून सावध राहणं गरजेचं आहे.एखाद्याला पॉर्न पाहाणं तुम्हाला चांगलचं महागात पडू शकतं. लपून पॉर्न पाहणाऱ्या तरुणांना हॅकर्स छुप्या पद्धतीने रेकॉर्ड करून पैसे उकळण्यासाठी धमकवत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पॉर्न पाह्तानाच्या वेळचा व्हिडिओ तयार केल्याची बतावणी करून तरुणांना ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात. ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार सायबर क्राईमचा नवा प्रकार आहे. मात्र, तुम्ही पॉर्न पाहात असाल तर तुम्हीही अशा हॅकर्सच्या जाळ्यात अडकून फसवू शकता. त्यामुळे वेळीच अशा हॅकर्सकडून येणाऱ्या मेलपासून सावध राहा.  मात्र, काही हॅकर्स तरुण पॉर्न पाहात असताना त्यांना त्या वेबसाइटच्या माध्यमातून छुप्या पद्धतीनं रेकॉर्ड करतात. त्यानंतर तुमच्या ई - मेलवर एक मेल पाठवला जातो. यामध्ये तुम्हाला तुमचा व्हिडीओ बनवल्याचे सांगून तो व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. ही धमकी देऊन डॉलर स्वरूपात पैशांची मागणी केली जाते. दरम्यान, हॅकर्स ठरावी एक रक्कम मागतात. ती रक्कम न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. मागण्यात आलेली रक्कम न दिल्यास तो खासगी व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी हॅकर्स दिली जाते. अशा प्रकारच्या सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी युजर्सला अशा कोणत्याही ई-मेलवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तसंच कोणत्या हॅकर्सच्या मेलला बळी पडू नये असंही आवाहन सायबर सेलकडून वारंवार कऱण्यात आलं आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसMumbaiमुंबई