शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्डकप सामन्यावर सट्टा सुरुच; दोन बुकींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 15:09 IST

दादर पाठोपाठ जुहूमधून गुजरातच्या दोन बुकींना अटक

ठळक मुद्देधरमभाई भाबलुभाई वाला, बिपीनभाई ब्रहमभट्ट अशी अटक दुकलीची नावे आहेत.दोघांकड़े जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.धरमभाई हा अहमदाबाद तर बिपीनभाई हा गुजरातचा रहिवासी आहे.

मनीषा म्हात्रेमुंबई - वर्ल्डकप सामन्यावर सट्टा सुरुच असल्याचे मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. वर्ल्डकप सामन्यावरील सट्टेबाजीप्रकरणी दादरमध्ये केलेल्या कारवाईपाठोपाठ जुहू पोलिसांनी गुरूवारी इंडिया विरुद्ध वेस्ट इंडीज़ सामन्यावर सट्टा लावणाऱ्या गुजरातच्या दोन बुकींना बेड्या ठोकल्या आहेत. धरमभाई भाबलुभाई वाला, बिपीनभाई ब्रहमभट्ट अशी अटक दुकलीची नावे आहेत.जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांच्या मार्गदर्शनाख़ाली ही कारवाई करण्यात आली. गुरुवारी रात्री सन अँड सँड हॉटेलच्या चौथा माळ्यावरील रुम नं ४३० मध्ये सट्टा सुरु असल्याची माहिती मिळताच तपास पथकाने छापा टाकला. तेव्हा धरमभाई, बिपीनभाई हे दोघे वर्ल्डकप सिरीजमधील इंडिया आणि वेस्ट इंडीज़ संघादरम्यान सुरु असलेला सामना खोलीच्या भिंतीवर लावलेल्या टिव्हीवर पाहून सट्टेबाजी करत होते. सट्ट्याबाबत संभाषण करत त्याबाबतचा नोंदी नोंदवून व लॅपटॉपमधे घेत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून २४ मोबाईल फोन,एक टॅब, दोन लॅपटॉप, रोख रक्कम ४४ हज़ार ६७० असा एकूण २ लाख ५५ हज़ार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक हरिभाउ गोविंदराव बिरादार (34) यांच्या तक़्रारीवरून जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरमभाई हा अहमदाबाद तर बिपीनभाई हा गुजरातचा रहिवासी आहे. दोघांकड़े जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.दादरमधील पोलीस उपनिरीक्षकासह अन्य आरोपीकड़े चौकशीवर्ल्डकप सामन्यावरील सट्टेबाजीप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अटक केलेले बुकी मिकीन शहा (33)  याच्यासह त्याचे साथीदार मनीष सिंग (31) आणि प्रकाश बनकर (32) हे वर्ल्डकप सिरीजमधील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लडवर सट्टा लावत होते. तसेच भायखळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर खरमाटे (34) हा सामना बघत होता. पोलिसांनी छापा टाकताच खरमाटेसह चौघांना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.  

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीSatta Bazarसट्टा बाजारICC World Cup 2019वर्ल्ड कप 2019Policeपोलिस