शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त;  शिवाजी पार्कातून नो फ्लाईंग झोन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 20:55 IST

मुंबई पोलिसांसह राज्य राखीव दल, क्युआरटी सज्ज; वाहतूक पोलिसांची शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी

ठळक मुद्दे मुंबई पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह, राज्य राखीव पोलीस दल, तसेच शिघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसांना सतर्कत राहणाच्या इशारा देण्यात आला असल्याने शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी ठेवण्यात आली आहे.  

मुंबई - संपूर्ण देशात उद्या  २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा सज्ज झाल्या असतानाच मुंबईत देखील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मुंबई पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह, राज्य राखीव पोलीस दल, तसेच शिघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसांना सतर्कत राहणाच्या इशारा देण्यात आला असल्याने शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी ठेवण्यात आली आहे.   उद्या प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखील नेहमीप्रमाणे प्रजासत्ताक दिनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असून मुंबईभर वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी होणाऱ्या गर्दीचा फायदा दहशतवाद्यांसारख्या समाजविघातक लोक फायदा घेऊ नये. तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महत्त्वाच्या सरकारी इमारती, रेल्वे स्थानके, विमानतळ तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांबरोबरच शिघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पॅराशूट, पॅरारायडिंग, रिमोटवर चालणारे ड्रोन उडविण्यास मुंबई हद्दीत बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर रहदारीच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून दाटीवाटीच्या वस्तीतील गेस्ट हाऊस, हॉटेल्स, लॉजेसची पोलिसांकडून झाडाझडती घेऊन संशयितांना ताब्यात घेण्यात येत असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

शिवाजी पार्क येथे नो फ्लाईंन झोन 

शिवाजी पार्क मैदानात ध्वजारोहण आणि संचलन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. अशा दरम्यान, शिवाजीपार्क मैदानाच्या हवेतुन कोणेतही विमान अथवा हेलिकॉप्टर जाणार नसून हा परिसर नो फ्लाईंग झोन असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :PoliceपोलिसRepublic Dayप्रजासत्ताक दिनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस