शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सहार वाहतूक विभागाच्या अंमलदारांची उत्तम कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 16:29 IST

अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या आवळल्या मुसक्या; 6.73 लाख रुपयांचा गुटखा जप्त

ठळक मुद्देटेम्पो चालकाला गुटख्यासह अंधेरी पोलिसांच्या ताब्यात दिले असता गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.हानी याने गुटखा कोठून आणला? कोणाला देण्यासाठी टेम्पोतून नेत होता? याचा तपास अंधेरी पोलीस करत आहेत.

मुंबई - गुटखा, सुगंधीत पान मसाल्यावर बंदी असतानाही अवैधरीत्या गुटख्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही उत्तम कामगिरी मुंबई वाहतूक शाखेच्या सहार वाहतूक विभागात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई रमाकांत मनोहर बडगुजर आणि पोलीस शिपाई  तुषार उदयसिंग भोसले यांनी केली. टेम्पो चालकाला गुटख्यासह अंधेरीपोलिसांच्या ताब्यात दिले असता गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.सहार वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई रमाकामत बडगुजर हे कर्तव्यावर असताना त्यांना गुटख्याची माहिती मिळाली. सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांना सांगून पोलीस शिपाई रमाकांत बडगुजर व पोलीस शिपाई तुषार भोसले यांनी सहार जंक्शन येथे आलेला टेम्पो क्रमांक एमएच - 04 / जीएफ - 9198 अडवला. टेम्पोची झडती घेतली असता त्यात गोण्या आढळून आल्या. त्या गोण्या उघडल्या असता त्यात मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला. पोशि बडगुजर व पोशि भोसले यांनी टेम्पो चालकासह गुटखा अंधेरीपोलिसांच्या ताब्यात दिला.दरम्यान, अंधेरी पोलिसांनी गुटख्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली. त्या गुटख्याचे मोजदाद केले असता त्याची किंमत एकूण 6 लाख 73 हजार 200 रुपये असल्याचे सप्ष्ट झाले. बंदी असताना गुटख्याची वाहतूक केल्या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी भादंवि कलम 328, 179, 188, 273 सह अन्न सुरक्षा मानदे कायदा कलम 59, 26(2), (4), सह अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या 20 जुलै 2018 च्या आदेशानुसार कलम 27(3), (डी), 27(3)(इ) नुसार गुन्हा दाखल करून टेम्पो चालक निरव सहानी याला अटक केली. सहानी याने गुटखा कोठून आणला? कोणाला देण्यासाठी टेम्पोतून नेत होता? याचा तपास अंधेरी पोलीस करत आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिसAndheriअंधेरी