आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरू शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली आहे. राममूर्ती नगर परिसरात राहणाऱ्या शर्मिला या १८ वर्षीय सॉफ्टवेअर टेक्निशियनची तिच्याच शेजाऱ्याने हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. केवळ हत्या करूनच तो थांबला नाही तर, या नराधमाने मृतदेहासोबतही अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण कर्नाटक हादरून गेले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मूळची मंगळूरची असलेली शर्मिला बेंगळुरूमध्ये कामा निमित्त राहत होती. १६ जानेवारी रोजी तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिसांनी जेव्हा १८ वर्षीय शेजारी कर्नल कुराई याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला, तेव्हा त्याने दिलेल्या कबुलीने पोलिसांचेही पाय डगमगले. आरोपीने शर्मिलाच्या घरावर चार-पाच वेळा पाळत ठेवली होती. संधी मिळताच तो घरात घुसला आणि त्याने शर्मिलावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
मृतदेहाचे कपडे बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
शर्मिलाने प्रतिकार केला असता झटापटीत तिचे डोके सोफ्याला आदळले आणि रक्तस्त्राव सुरू झाला. तरीही नराधम थांबला नाही, त्याने दोन्ही हातांनी तिचा गळा दाबून तिला संपवले. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने तिचेच कपडे वापरून रक्ताचे डाग पुसले. अत्यंत विकृत मानसिकतेतून त्याने मृतदेहावरही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने कपाटातील दुसरे कपडे काढून मृतदेहाला घातले आणि तिला सरळ झोपवले.
टिश्यू पेपरने जाळण्याचा प्रयत्न, पण एका चुकीने अडकला
गुन्ह्याची वाच्यता होऊ नये म्हणून आरोपीने बेडवरील काही कपडे टिश्यू पेपरने पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. शर्मिलाचा मोबाईलही त्याने चोरून नेला होता. मात्र, घाईघाईत त्याने तिची पॅन्ट शेजारच्या झाडावर फेकली होती, जी पोलिसांच्या हाती लागली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे राममूर्ती नगर पोलिसांनी कर्नल कुराईला बेड्या ठोकल्या आहेत.
Web Summary : Bengaluru: Software engineer Sharmila murdered by neighbor, Karnal Kurai, who attempted to desecrate her body. He tried to destroy evidence, changed her clothes, and set fire to items. Police arrested him using CCTV footage and forensic evidence after her pants were found on a tree.
Web Summary : बेंगलुरु: सॉफ्टवेयर इंजीनियर शर्मिला की पड़ोसी कर्नल कुराई ने हत्या कर दी, जिसने उसके शरीर को अपवित्र करने की कोशिश की। उसने सबूत नष्ट करने की कोशिश की, उसके कपड़े बदले और वस्तुओं में आग लगा दी। पुलिस ने सीसीटीवी फुटेज और फोरेंसिक सबूतों का उपयोग करके उसे गिरफ्तार कर लिया।