शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 11:23 IST

Bengaluru Murder Case : बंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच आणखी एक घटना घडली आहे. एका फ्लॅटमध्ये महिलेच्या मृतदेहाचे ३० तुकडे सापडले आहेत. मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते.

बंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच आणखी एक घटना घडली आहे. एका फ्लॅटमध्ये महिलेच्या मृतदेहाचे ३० तुकडे सापडले आहेत. मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. महालक्ष्मी असं महिलेचं नाव आहे. महालक्ष्मी गेल्या ९ महिन्यांपासून पती हेमंत दासपासून वेगळी राहत होती. आता याप्रकरणी मृत महिलेचा पती हेमंत दास याने मोठा दावा केला. 

अशरफ नावाच्या तरुणासोबत पत्नी रिलेशनशिपमध्ये होती आणि त्याने तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले असं म्हटलं आहे.  इंडिया टुडेशी बोलताना हेमंत दासने सांगितलं की, एक महिन्यापूर्वी तो आपल्या पत्नीला भेटला होता, जेव्हा तो त्याच्या मुलीला भेटायला आला होता. हेमंतने सांगितलं की, महालक्ष्मी काही महिन्यांपासून अशरफसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि ती त्याच्यासोबत फ्लॅटमध्ये राहत होती.

फ्लॅटमध्ये महालक्ष्मीचा मृतदेह ३० तुकड्यांमध्ये आढळून आला. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने महालक्ष्मीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं, तेव्हा सर्वजण हादरले. महालक्ष्मीची हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस जेव्हा फ्लॅटवर पोहोचले तेव्हा त्यांना तेथे एक बॅगही ठेवल्याचं आढळलं. महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा आरोपीचा डाव असल्याचा पोलिसांना संशय आहे.

कोण आहे अशरफ?

अशरफ हा उत्तराखंडचा रहिवासी आहे. तो बंगळुरूमध्ये एका दुकानात काम करत होता. हेमंत दासने सांगितलं की, महालक्ष्मीसोबत त्याचं लग्न केवळ ६ महिने टिकलं. यानंतर दोघेही वेगळे राहू लागले. यानंतर महालक्ष्मीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि बंगळुरूला येणं बंद केलं. हेमंत दासने दावा केला की, त्याची पत्नी आणि अशरफ यांचे संबंध होते. अशरफनेच खून केल्याचा संशय हेमंतने व्यक्त केला.

पोलिसांनी काय सांगितलं?

महालक्ष्मी हत्येप्रकरणी बंगळुरूचे पोलीस आयुक्त दयानंद म्हणाले की, पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीची ओळख पटली असून त्याच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पोलिसांनी आरोपीबाबत माहिती देण्यास नकार दिला. आरोपी हा बाहेरचा असून त्याच्याबाबत आपण जास्त माहिती देऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूर