शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
2
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
3
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
6
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
7
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
8
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
9
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
10
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
11
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
12
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
13
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
14
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
15
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
16
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
17
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
18
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
19
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 20:52 IST

Husband Killed Wife Crime News: डॉक्टर पती-पत्नीचा एक धक्कादायक प्रकार पोलिस तपासातून समोर आला

Husband Killed Wife Crime News: डॉक्टर पती-पत्नीचा एक धक्कादायक प्रकार बंगळुरूत समोर आला. पोलिसांनी तब्बल सहा महिन्यांनंतर २९ वर्षीय त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर कृतिका एम. रेड्डी या महिलेच्या मृत्यूचे धक्कादायक गूढ उलगडले. या हत्येमागे तिचा नवरा आणि विक्टोरिया हॉस्पिटलमधील गॅस्ट्रो सर्जन डॉक्टर महेंद्र रेड्डी असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी पती महेंद्र रेड्डी याला अटक केली आणि हत्येचे गूढ उकलले. पण हा सारा प्रकार कसा घडला, याबाबत पोलिसांनी माहिती दिली.

कसा घडला गुन्हा?

२६ मे रोजी कृतिका आणि महेंद्र यांचा विवाह झाला होता. परंतु लग्नानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. या वादांचा शेवट थरकाप उडवणाऱ्या हत्येने झाला. पोलिस तपासानुसार महेंद्रने आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा दुरुपयोग करून पत्नीला एनेस्थेशिया औषध प्रोपोफोल चा अतिमात्रेचा डोस दिला. हे औषध साधारणपणे शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्यासाठी वापरले जाते, पण अतिमात्रेत दिल्यास त्याने श्वासोच्छ्वास बंद होऊन मृत्यू होऊ शकतो.

गोड बोलून पत्नीचा काटा काढला...

कृतिका आपल्या वडिलांच्या मराठाहळ्ळी येथील घरी राहात असताना महेंद्रने 'वैद्यकीय सेवा' देण्याच्या बहाण्याने तिला इंजेक्शन दिले. पहिल्या इंजेक्शननंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. महेंद्रने तिला विश्रांती घ्यायला सांगितले आणि पुन्हा दोन दिवसांनी दुसरा डोस दिला. या दुसऱ्या इंजेक्शननंतर तिची प्रकृती झपाट्याने खालावली. रात्री उशिरा तिला इंजेक्शन देऊन तो बाहेर गेला आणि सकाळी कृतिका बेशुद्ध अवस्थेत सापडली. डॉक्टर असूनही त्याने विचित्र प्रकार केले आणि तिचा जीव घेतला.

फॉरेन्सिक अहवालानुसार, कृतिकाचा मृत्यू एनेस्थेशियाच्या घातक ओव्हरडोसमुळे झाला. पत्नीच्या विश्वासाचा गैरवापर करून स्वतःच्या व्यावसायिक कौशल्याने जीव घेणाऱ्या डॉक्टरला कठोर शिक्षा व्हावी, असा सूर सर्वत्र दिसून येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor Husband Murders Wife with Anesthesia Overdose; Police Stunned

Web Summary : Bengaluru doctor murdered his wife, a dermatologist, with a fatal anesthesia overdose. He exploited his medical knowledge, administering propofol, normally used for surgery, to kill her. Marital disputes preceded the shocking crime. Police arrested the husband after six months of investigation.
टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारCrime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूर