शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:48 IST

आरोपी युवक आपल्या प्रेयसीला लग्नाच्या इराद्याने गोव्याला घेऊन गेला होता. मात्र, नंतर युवतीचा मृतदेह मोलेम वन्यजीव अभयारण्यात रस्त्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर सापडला.

बंगळुरू येथील एका २२ वर्षीय तरुणाने गोव्यात आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक आपल्या प्रेयसीला लग्नाच्या इराद्याने गोव्याला घेऊन गेला होता. युवतीचा मृतदेह मोलेम वन्यजीव अभयारण्यात रस्त्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर सापडला.

हत्येचा आरोपी संजय केविन एम. (वय २२) असे आहे, जो उत्तर बंगळुरूचा रहिवासी आहे. मृत युवती रोशनी मूसा एम. (वय २२) ही देखील त्याच परिसरात राहत होती. रोशनी कर्नाटकातील एका शाळेत काम करत होती, तर केविन बेरोजगार होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?गेल्या सोमवारी गोव्यातील मोलेम वन्यजीव अभयारण्याजवळ एका युवतीचा मृतदेह आढळून आला होता. स्थानिक शेतकरी जंगलात 'बिबेम' (अंकुरित काजू) शोधत असताना त्याला हा मृतदेह दिसला. त्याने तातडीने गोवा पोलिसांना याची माहिती दिली. दक्षिण गोव्याचे एसपी टिकम सिंह वर्मा यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलीस पथकाने लगेच तपास सुरू केला. युवतीची ओळख रोशनी मूसा एम. म्हणून पटली. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. गळ्यावरही खोलवर जखम होती, जी एखाद्या तीक्ष्ण हत्याराने केलेल्या हल्ल्यामुळे झाली होती.

पहिले धागेदोरे कसे मिळाले?तपासादरम्यान, रोशनीच्या सामानासोबत बसचे एक तिकीट सापडले. यातून तपासकर्त्यांना पहिला महत्त्वाचा धागा मिळाला. दोघेही बंगळूरुहून गोवा कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बसने आले होते. त्यांनी येथे एक दिवस थांबण्याची योजना आखली होती. तपासात समोर आले की, बसचे तिकीट आरोपी संजय केविन एम. यानेच बुक केले होते. टिकम सिंह वर्मा यांनी सांगितले की, केविनला मंगळवारी कर्नाटकातील हुबळी येथून अटक करण्यात आली. त्याला चौकशीसाठी गोव्यात आणण्यात आले.

पोलिसांनी काय सांगितले?चौकशीनंतर पोलिसांनी सांगितले की, रोशनी आणि संजय लग्नासाठी बंगळूरुहून गोव्यात आले होते. याच दरम्यान दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात संजयने रोशनीची हत्या केली आणि तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. मात्र, ते एका निर्जन ठिकाणी बसमधून का उतरले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महिलेचा मृतदेह नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जंगली भागात सापडला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा