बंगळुरूच्या येलहंका न्यू टाउन येथील मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन (MAHE) च्या हॉस्टेलमध्ये १९ वर्षीय बी.टेक विद्यार्थी लक्ष्य मिश्रा याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचे वडील अंजनी मिश्रा यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत मुलाची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. लक्ष्य हा जमशेदपूरमधील कदमा भाटिया बस्ती येथील रहिवासी होता, तर त्याचं कुटुंब मूळचे बिहारच्या आरा जिल्ह्यातील आहे. या घटनेच्या एक दिवसानंतर, नातेवाईकांनी संस्थेवर सत्य लपवल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याला संशयास्पद मृत्यू मानून BNSS च्या कलम १९४ (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्यवर ८ एप्रिल रोजी शवविच्छेदनानंतर बंगळुरूमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे नातेवाईक १० एप्रिलच्या रात्री जमशेदपूरला परतले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्य मिश्रा बी.टेक दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास तो गोविंदपुरा येथील कॉलेज हॉस्टेलच्या नवव्या मजल्यावरून खाली पडला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
"खिडकीची रचना पाहता तिथून उडी मारणं शक्यच नाही"
कॉलेज प्रशासनाचा दावा आहे की लक्ष्यने आत्महत्या केली आहे. मात्र वडिलांनी हे फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, "माझ्या मुलाने आत्महत्या केली असावी अशी एकही परिस्थिती दिसत नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होईल की तिथे आणखी कोण होतं. खिडकीची रचना पाहता तिथून उडी मारणं शक्यच नाही. हा एक कट असून त्याची चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून दुसरा कोणताही मुलगा अशा मृत्यूचा बळी ठरणार नाही." अद्याप सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्यात आलेलं नाही आणि कोणतेही महत्त्वाचे पुरावे समोर आलेले नाहीत. रूममेटची अनुपस्थिती आणि त्याच्या जबाबातील विसंगती यामुळेही प्रश्न उपस्थित होत आहेत.
"रुग्णालयात मृतदेह पाहिला"
वडील अंजनी मिश्रा यांनी सांगितलं की, संस्थेने दिलेली माहिती आणि घटनास्थळाची प्रत्यक्ष स्थिती यात खूप फरक आहे. त्यांना सकाळी ३.३० च्या सुमारास मुलगा नवव्या मजल्यावरून पडल्याची माहिती फोनवरून देण्यात आली आणि अर्ध्या तासानंतर त्याच्या मृत्यूची पुष्टी केली गेली. जेव्हा त्यांनी रुग्णालयात मृतदेह पाहिला, तेव्हा शरीरावर जखमांच्या स्पष्ट खुणा नव्हत्या. मणिपालचे अधिकारी खरं बोलत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
सोशल मीडियावर 'जस्टिस फॉर लक्ष्य मिश्रा' ही मोहीम
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये लक्ष्य रात्री १ च्या सुमारास नवव्या मजल्यावर एकटा फिरताना दिसला आहे. पोलीस प्राध्यापक आणि संबंधित लोकांची चौकशी करत आहेत. कुटुंबाने पूर्ण सीसीटीव्ही रेकॉर्डिंग जाहीर करण्याची, स्वतंत्र संस्थेमार्फत फॉरेन्सिक आणि पोस्टमॉर्टम तपासणी करण्याची आणि हॉस्टेल प्रशासनाची कसूक चौकशी करण्याची मागणी केली आहे. अंजनी मिश्रा हे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयात कार्यरत आहेत. सध्या त्यांची नियुक्ती गुमला येथे आहे. लक्ष्यचे कुटुंब आणि मित्रांनी सोशल मीडियावर 'जस्टिस फॉर लक्ष्य मिश्रा' ही मोहीम सुरू केली आहे.
Web Summary : A B.Tech student, Lakshya Mishra, died at a Manipal University hostel in Bangalore. His father alleges foul play, claiming the window design makes suicide impossible. The family demands a thorough investigation, citing discrepancies and missing CCTV footage. A 'Justice for Lakshya Mishra' campaign has started online.
Web Summary : बैंगलोर के मणिपाल विश्वविद्यालय के हॉस्टल में बी.टेक के छात्र लक्ष्य मिश्रा की मौत हो गई। पिता ने हत्या का आरोप लगाते हुए कहा कि खिड़की की बनावट आत्महत्या को असंभव बनाती है। परिवार ने सीसीटीवी फुटेज और विसंगतियों का हवाला देते हुए गहन जांच की मांग की है। 'जस्टिस फॉर लक्ष्य मिश्रा' अभियान शुरू।