कर्नाटकातील बंगळुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आलली आहे. येथील पूर्णा प्रजना लेआउटमधील OYO हॉटेलच्या रूममध्ये एका 25 वर्षीय तरुणाने 36 वर्षीय तरुणीची हत्या केल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच जवळपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्णा प्रजना लेआउट येथील एका OYO हॉटेलच्या रूममध्ये 25 वर्षीय यशस ने आपली 36 वर्षीय प्रेयसी हरिनी हिची कथीत हत्या केली. हे दोघेही केंगेरीचे रहिवासी असल्याचे समजते. यशस एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. मात्र, हिचा खुलासा दोन दिवसांनंतर रविवारी झाला. या प्रकरणी सुब्रमण्यपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात माहिती देताना डीसीपी साऊथ लोकेश जगलासर म्हणाले, 6-7 जून रोजी बंगळुरूच्या सुब्रमण्यपुरा पोलीस ठाण्यातच्या हद्दीत एका 36 वर्षीय महिलेची तिच्या एका जवळच्या मित्राने हत्या केली. आरोपी आणि मृत महिला एकमेकांना जवळपास एकावर्षापासून ओळखत होते.
संबंधित मृत महिला गेल्या दोन महिन्यांपासून आरोपीपासून हळू हळू दूर होत होती. यामुळे रागावलेल्या आरोपीने तिची चाकूने भोसकून हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली आहे.