शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

दहिसर येथे एका सराफाला लुबाडणारा भामटा मडगावात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 20:59 IST

अन्य एका साथीदाराला अटक

ठळक मुद्देसाडेपाच लाखांचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहे. मागाहून त्याच्यावर दहिसर पोलीस ठाण्यात तक्रारही नोंद झाली होती. कारागिरी करण्यासाठी सराफाने त्याला 178 ग्राम सोन्याचे दागिने दिले होते.

मडगाव - दहिसर येथील एका सराफाकडून साडेपाच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेउन महिन्याभरापूर्वी गोव्यात पळून आलेल्या शेख मथियार रेहमान याच्या मुसक्या मडगावात पोलिसांनी आज सोमवारी आवळल्या. त्याचा अन्य एक साथिदार बबलू चौधरी याला पोलिसांनी जेरबंद केले. साडेपाच लाखांचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहे. शेख हा मूळ बंगाल राज्यातील असून, तो काही वर्षापूर्वी मडगावात कारागिरी करीत होता. येथील मुडडी - नावेली येथे तो रहात होता.रेहमान याच्या शोधासाठी दहिसर येथील पोलीस मडगावात आज सोमवारी दाखल झाले. मडगाव पोलीस ठाण्यात आल्यानंतर या पोलिसांनी स्थानिक पोलिसांना संशयिताचे छायाचित्र व मोबाईल क्रमांक दिला. मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी संशयिताचा माग काढण्यास सुरुवात केली. यावेळी तो मुडडी येथे रहात असल्याचे कळाले. मडगाव पोलीस ठाण्याचे एलआयबी पोलीस पथक गोरखनाथ गावस व विशाल प्रभू यांनी नावेली येथे जाउन रेहमान याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपण दागिने बबलू याला विकण्यासाठी दिले होते असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी बबलूलाही पकडले. बबलू याने एका सराफाला दागिने विकले होते. ते मागाहून जप्त करण्यात आले. शेख याने मुंबईतील एका सरफाचे दागिने पळविले होते. कारागिरी करण्यासाठी सराफाने त्याला 178 ग्राम सोन्याचे दागिने दिले होते. ते परस्पर घेउन तो गोव्यात पळून आला होता. मागाहून त्याच्यावर दहिसर पोलीस ठाण्यात तक्रारही नोंद झाली होती.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसgoaगोवाRobberyचोरी