शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

हॉटेलच्या रूममधून येत होता पत्नीचा आवाज, पतीने तिला बोलवलं तर उघड झालं तिचं सत्य....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 12:29 IST

याप्रकरणी हॉटेलचा मालक राजदीप घोष, हॉटेल मॅनेजर विपुल कर आणि इतर एका कर्मचाऱ्याला कंचनगंगा हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. 

बंगालच्या अलीपूरद्वार शहरात एका पतीने हॉटेलच्या रूममध्ये जाऊन आपल्या पत्नीला एका दुसऱ्याच व्यक्तीसोबत रंगेहाथ पकडलं आहे. या घटनेची माहिती परिसरात आगीसारखी पसरली. त्यानंतर हॉटेलबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते आणि बाहेर मोठा गोंधळ सुरू होता.ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता अलीपूरद्वारच्या चौपाटीवरील एक एलीट हॉटेलमध्ये घडली. स्थानिक लोकांच्या गोंधळामुळे आणि घटनेची माहिती मिळताच अलीपूरद्वार पोलीस स्टेशनमधून मोठ्या प्रमाणात पोलीस दल घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी स्थिती सांभाळली. पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, याप्रकरणी हॉटेलचा मालक राजदीप घोष, हॉटेल मॅनेजर विपुल कर आणि इतर एका कर्मचाऱ्याला कंचनगंगा हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. 

पकडली गेल्यावर आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीने तिला हॉटेलमध्ये पाठवलं होतं. महिलेने दावा केला आहे की, तिच्या पतीनेच तिला हॉटेलच्या रूममध्ये अज्ञात व्यक्तीसोबत जाण्यास आणि अश्लीस फोटो क्लीक फोटो करून देण्यास सांगितले होते. 

महिलेने सांगितले की, तिच्या पतीने त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून पैसे मागण्याची आयडिया दिली होती. पण त्या व्यक्तीला याबाबत आधीच माहिती होती. तो बऱ्याच वर्षापासून हेच काम करत होता. महिलेच्या पतीचं नाव समीर दास आहे. तो मजुरी करून पैसे कमावतो.

समीरने सांगितलं की, महिलेच्या या कामामुळे घरात नेहमीच भांडणं होत होती. समीर म्हणाला की मी बऱ्याच दिवसांपासून तिचे हे कारनामे बघत होतो. आज सकाळी जेव्हा मी घरातून निघालो तेव्हा मी तिचा पाठलाग केला. नंतर मी तिला एक हॉटेलमध्ये जाताना पाहिलं. 

समीरनुसार, यानंतर त्याने त्याच्या मित्रांना फोन करून हॉटेलसमोर बोलवलं. नंतर ते हॉटेलमध्ये गेले. एका रूममधून त्याला त्याच्या पत्नीचा आवाज आला. त्यानंतर त्याने पत्नीला बाहेर येण्यास सांगितले. तेव्हा एक अज्ञात व्यक्ती बाहेर आली. हॉटेल मॅनेजरच्या मदतीने ती व्यक्ती तेथून फरार होण्यास य़शस्वी झाली. अलीपूरद्वार पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सांगितले की याप्रकरणी तीन लोकांना अटक करण्यात आली आहे.  तसेच पुढील चौकशी केली जात आहे. 

स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले की, या हॉटेलवर नेहमीच असे आरोप होत राहतात. इथे अशाप्रकारचे अवैध कामे नेहमीच होत असतात.  ज्यावरून हॉटेलच्या मालकाला अनेकदा इशाराही देण्यात आला आहे. पण तरी त्याने काही ऐकलं नाही. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेट