शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Karuna Munde : करुणा मुंडे यांच्या सांताक्रुझमधील घरी बीड पोलीस दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 14:46 IST

Karuna Munde : सध्या हे पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात असल्याचेही समजते.

ठळक मुद्देआयपीएस अधिकारी सुनील जायभये यांच्या नेतृत्वाखाली हे पथक मुंबईत दाखल झाल्याचेही समजते.

मुंबई - महाराष्ट्रचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे यांच्या मुंबईमधील सांताक्रुझ येथील घरात बीड पोलीस दाखल झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. आयपीएस अधिकारी सुनील जायभये यांच्या नेतृत्वाखाली हे पथक मुंबईत दाखल झाल्याचेही समजते. याप्रकरणी जायभये यांना संपर्क केला असता अधिक माहिती देण्याचे त्यांनी टाळले. सध्या हे पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात असल्याचेही समजते.

परळी दौऱ्यावर आलेल्या करुणा मुंडे यांच्यावर ५ सप्टेंबर रोजी जातिवाचक शिवीगाळ करून चाकूहल्ला केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला. ६ सप्टेंबर रोजी करुणा शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या अरुण दत्तात्रय मोरे यांना अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. सुप्रिया सापतनेकर यांनी करुणा यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, तर अरुण मोरे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादीनुसार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता त्या बेबी छोटूमियां तांबोळी यांच्यासह वैद्यनाथ मंदिरात दर्शनसाठी गेल्या होत्या. यावेळी करुणा मुंडे आणि अरुण मोरे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द काढत होते. याचा जाब विचारल्याने करुणा मुंडेंनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत बेबी छोटूमियां तांबोळी हिच्या उजव्या हातास धरून खाली पाडले, तर अरुण दत्तात्रय मोरे याने चाकूने त्यांच्या पोटावर वार केला.

चालकासह जमावावरही गुन्हा

गाडीत आढळलेल्या पिस्तूलप्रकरणी करुणा मुंडे यांचा चालक दिलीप पंडित याच्यावर गुन्हा नोंद करुन त्यास अटक करण्यात आली . करुणा मुंडे यांच्या तक्रारीवरुन जमावाविरुध्द कोविड नियमांचा भंग करुन बेकायदेशीर गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची निष्काळजी झाली असेल तर चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPoliceपोलिसAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाArrestअटकMumbaiमुंबईBeedबीड