शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुलगा होणार नसल्यामुळे पतीने केला पत्नीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 07:48 IST

बीडमधील घटना; दुसऱ्या विवाहास विरोध केल्याने मारहाण

बीड : कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर एकुलता एक मुलगा दगावला. आता वंशाला दिवा हवा म्हणून दुसरे लग्न करण्यावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणातून पतीने पत्नीचे पाय बांधून तिला बेदम मारहाण केली. त्यातच तिचा मृत्यू झाला. हा प्रकार शुक्रवारी रात्री औरंगपूर शिवारात घडला. दरम्यान, आरोपी पती महादेव आसाराम रेड्डे यास पोलिसांनी अटक केली आहे.राधा महादेव रेड्डे असे मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. दहा वर्षांपूर्वी राधा यांचा विवाह गेवराई तालुक्यातील इरगाव येथील महादेव आसाराम रेड्डे (३६) याच्यासोबत झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. मात्र, आजारपणामुळे ८ वर्षांच्या मुलाचा २ वर्षांपूर्वी मृत्यू झाला. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यामुळे आता मुलगा होणार नसल्याने दुसरी बायको करावी लागेल, असा तगादा महादेवने पत्नी राधाकडे लावला. यावर दुसरे लग्न करण्यापेक्षा मुलगा होण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करून घेऊ असे तिने सुचविले. यासाठी बीडच्या डॉक्टरांनी तपासण्या करून ३० हजार रुपये खर्च सांगितला. एवढे पैसे काेठून आणायचे यावरून महादेवने रुग्णालयातच राधाला शिवीगाळ करून भांडण केले.घरी आल्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी रात्री ते ५ फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास महादेवने पत्नी राधा हिचे हातपाय बांधून लाकडी दांड्याने मारहाण केली व घरातून निघून गेला. सकाळी जखमी राधाने शेजारच्या महिलेला हाक मारून दवाखान्यात नेण्याची विनंती केली. दवाखान्यात घेऊन जातानाच राधाचा मृत्यू झाला. ही माहिती कळताच तिच्या माहेरच्या लोकांनी गेवराई पोलिसांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी महादेव रेड्डे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मदतीसाठी कोणीच आले नाही आरोपी महादेव आसाराम रेड्डे हा औरंगपूर येथील एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करत होता. आजूबाजूला शेजारी कोणी नसल्यामुळे मारहाण झाल्यानंतरदेखील सोडविण्यासाठी कोणी येणे शक्य नव्हते.