शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

स्वत: पोलीस बनला अन् मित्राला TC बनवलं; प्रवाशांना लुटायला गेले अन् जाळ्यात सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 18:47 IST

Fake Police and fake TC : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनायक भगवान त्रिबंके (27, रा. अंबरनाथ) व त्याचा साथीदार धीरज यादव (30, रा. अंबरनाथ) अशी या भामट्यांची नाव आहेत. 

महानगर एक्प्रेसमध्ये दोन इसम प्रवाशांचे तिकीट चेक करत होते. एक झाला पोलीस आणि दुसरा टीसी बनला. संशय आल्याने प्रवाशाने फिरवला 139 रेल्वे हेल्पलाईन नंबर अखेर "अशी" सूत्र फिरली आणि पोलिसांच्या जाळ्यात एक आरोपी सापडले तर दुसरा पसार झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनायक भगवान त्रिबंके (27, रा. अंबरनाथ) व त्याचा साथीदार धीरज यादव (30, रा. अंबरनाथ) अशी या भामट्यांची नाव आहेत. 

आजकाल झटपट पैसे मिळवण्यासाठी कोणकधी कुठला मार्गाचा वापर करेल याचा काही नेम नाही. लवकर पैसे मिळवण्यासाठी चक्क एक होमगार्ड पोलीस झाला  तर त्याचा मित्र टीसी झाला. मग काय यांचा प्लॅन ठरला. एक्प्रेसमध्ये जाऊन पोलीस आणि टीसी असल्याचं भासवत लोकांची फसवणूक करायला त्यांनी सुरवात केली. मात्र महानगर एक्प्रेमध्ये या दोघांचा भांडाभोड झाला अन् यापैकी एकाची एक्प्रेसमधून थेट त्यांची जेलमध्ये रवानगी झाली.  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनायक भगवान त्रिबंके (27, रा. अंबरनाथ) व त्याचा साथीदार धीरज यादव (30, रा. अंबरनाथ) अशी या भामट्यांची नाव आहेत. विनायक हा होमगार्ड असून त्याला पोलिसांनी अटक केलीय तर धीरज हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.  महानगर एक्प्रेस कल्याण स्थानकातून सुटताच जनरल डब्यात दोन जणांनी  तिकीट चेक करायला सुरुवात केली. यावेळी दीपक कुमार बिन्द राजकुमार हे देखील प्रवास करत होते. आम्ही पोलीस आणि टीसी आहोत असं सांगत या दोघांनी त्यांच्याकडून 700 रुपये हिसकावून घेतले. इतर प्रवासी हा सर्व प्रकार पाहत होते. प्रवाशांपैकी एका प्रवाशाला या दोघांवर संशय आला. प्रवाशाने रेल्वेच्या 139 या हेल्पलाईनवर नंबरवर फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी नाशिक रेल्वे स्थानकात थांबलेल्या एक्स्प्रेसच्या डब्यातून दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र धीरज हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. या दोघांवर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या दोघांनी अजून किती ठिकाणी लोकांनां टोप्या घातल्या याची देखील चौकशी पोलीस करत आहेत. 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसkalyanकल्याणrailwayरेल्वेpassengerप्रवासी