शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून महिला पोलिसाला मारहाण; गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 06:30 IST

अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव दीपक देशमुख (४९) असे असून तो ईओडब्ल्यू शाखेत सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.

मुंबई : मालाडच्या कुरार पोलिसांनी मंगळवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेशी ( ईओडब्ल्यू ) संलग्न असलेल्या एका सहायक पोलीस निरीक्षकाला अटक केली. याच विभागाशी संलग्न असलेल्या एका महिला पोलीस निरीक्षकाला शिवीगाळ, मारहाण आणि विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 

अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव दीपक देशमुख (४९) असे असून तो ईओडब्ल्यू शाखेत सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख याचे पीडितेसोबत एकतर्फी प्रेमसंबंध होते. मात्र तिचा त्यास विरोध होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून तो तिचा मानसिक छळ करत होता. अखेर कंटाळून पीडितेने याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली. तक्रारीच्या आधारे आरोपीची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली. मात्र, त्यानंतरही आरोपी पीडितेचा मानसिक छळ करत होता. तसेच कुरार येथील तिच्या घरीही जाण्यास त्याने सुरवात केली. त्यामुळे नाईलाजास्तव काही महिन्यांपूर्वी पीडितेने कुरार पोलिसांकडे लेखी तक्रार दिली, असे कुरार पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपीला त्याचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले; पण तो आला नाही.  तसेच मंगळवारी रात्री आरोपी हा पुन्हा फिर्यादीच्या घरी गेला. तिथे जाऊन त्याने तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेत अटक केली.

टॅग्स :Policeपोलिस