शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिलेस विवस्त्र करून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 05:37 IST

माण तालुक्यातील एका गावात २७ वर्षीय महिला तिच्या सासू सासऱ्यांबरोबर राहते. तिचे पती हे नोकरीनिमित्त पुण्यात असतात. या महिलेचा दीर अविनाश बापूराव सांळुखे याने शेजारील संजय तुपे यांच्या मुलीशी महिन्यापूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह केला आहे.

म्हसवड (जि. सातारा) : घराशेजारी राहणाऱ्या मुलीस दिराबरोबर पळून जाण्यास मदत केल्याचा राग मनात धरून मुलीच्या घरच्यांनी एका २७ वर्षीय विवाहित गर्भवती महिलेला विवस्त्र करून मारहाण केली. माण तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. याबाबत सहाजणांवर म्हसवड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेतील संशयित आरोपी फरार झाले आहेत.|माण तालुक्यातील एका गावात २७ वर्षीय महिला तिच्या सासू सासऱ्यांबरोबर राहते. तिचे पती हे नोकरीनिमित्त पुण्यात असतात. या महिलेचा दीर अविनाश बापूराव सांळुखे याने शेजारील संजय तुपे यांच्या मुलीशी महिन्यापूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे संजय तुपे व त्यांचे कुटुंबीय संबंधित महिला व तिच्या कुटुंबियांना वारंवार शिवीगाळ करतात. दि. २५ ऑक्टोबर रोजी मीनाक्षी संजय तुपे, साकरूबाई विष्णू तुपे, कल्पना आण्णा तुपे, संतोष विष्णू तुपे, संजय श्रीरंग तुपे, आण्णा श्रीरंग तुपे यांनी तिला मारहाण केली.हा वाद मिटविण्यास साकरूबाई आणि कल्पना यांनी संबंधित महिलेला तिचा दीर मोहन मोतीराम साळुंखे यांच्याकडे नेले. परत येताना साकरूबाई, कल्पना, मीनाक्षी या तिघींनी तिला ओढत डोंगरावर नेले विवस्त्र करुन मारहाण केली. अंगावर कपडे नसल्याने ही महिला जोराजोरात ओरडू लागली. जवळच्याच शेतात काम करत असलेले या महिलेचे दीर जनार्दन साळुंखे व जानुबाई साळुंखे यांनी तिला कपडे आणून दिले. दरम्यान, तिच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्रही तुटून गहाळ झाले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर