शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपानाच्या बिलात सवलत मागितल्याने ग्राहकाला मारहाण, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 00:02 IST

Crime News : मद्यपानाच्या बिलात सवलत मागितल्याने दोघा ग्राहकांना जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात बारच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई  - मद्यपानाच्या बिलात सवलत मागितल्याने दोघा ग्राहकांना जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात बारच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा बार मध्यरात्री तीन वाजेपर्यंत सुरू असताना ही घटना घडली आहे.सीबीडी सेक्टर १५ येथील सिक्वेन्स बारमध्ये २ फेब्रुवारीला पहाटेला ही घटना घडली आहे.सीवूड येथे राहणारे केदारनाथ पाटील, विठ्ठल चव्हाण व हरिनाथ माने हे त्या ठिकाणी मद्यपान करण्यासाठी बसले होते. काही वेळाने माने त्या ठिकाणावरून निघून गेल्यानंतर पाटील व चव्हाण दोघेच मध्यरात्रीपर्यंत तिथे बसले होते. अखेर पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी बिल मागविले असता, वेटरने त्यांना ३० हजार रुपयांचे बिल दिले. मात्र, नियमित ग्राहक असल्याने मालक ओळखीचा असल्याचे सांगत, पाटील यांनी मॅनेजरकडे बिलात सवलत मागितली, परंतु त्यांनी सवलत मिळणार नसल्याचे सांगितल्यानंतरही पाटील यांनी २५ हजार रुपये भरून बारमधून निघू लागले. याच वेळी पाठीमागून आलेल्या बारच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बिलात सवलत मिळणार नसल्याचे सांगत बाकीच्या पैशांची मागणी केली. यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला असता, बारच्या वेटर व इतर कर्मचाऱ्यांनी पाटील व चव्हाण यांना जबर मारहाण केली. याचदरम्यान पोलिसांचे गस्ती वाहन तेथे आल्याने या दोघांची त्यांच्या तावडीतून सुटका झाली. या घटनेत जखमी झालेल्या दोघांनी पालिका रुग्णालयात दाखल केल्यानंतर, त्यांनी बुधवारी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार, बारच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नया घटनेवरून सिक्वेन्स बार हा पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होता, हे समोर आले आहे. यापूर्वी नेरुळमध्येही मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या बारमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतरही दोन्ही बारवर पोलिसांकडून कारवाई झालेली नाही. यावरून बार व्यावसायिकांना उत्पादन शुल्क आणि पोलीस यांचे छुपे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई