शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अंगात भूत असल्याच्या अंधश्रद्धेपोटी मारहाण, मायलेकाचा मृत्यू, मांत्रिकासह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 13:17 IST

जवळच्या नातेवाईकांकडून घडलेल्या या अघोरी प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी मांत्रिकासह अन्य तिघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे

कल्याण -  अंगात भुत आहे ते भुत तंत्रमंत्र करून बाहेर निघेल या अंधश्रध्देपोटी अंगावर हळद टाकून काठीने केलेल्या बेदम  मारहाणीत पंढरीनाथ शिवराम तरे (वय 50) आणि चंदुबाई शिवराम तरे (वय 76) या मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना येथील पश्चिमेकडील अटाळी गावात शनिवारी संध्याकाळी घडली. जवळच्या नातेवाईकांकडून घडलेल्या या अघोरी प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी मांत्रिकासह अन्य तिघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.अटाळी येथील गणेशनगरमधील शिवचंद्र सदनमध्ये राहणारे पंढरीनाथ यांची पुतणी कविता कैलास तरे हिचे अंगात दैवीशक्ती संचारते या संशयातून पंढरीनाथ यांची पत्नी रेश्मा आणि दुसरी पुतणी संगिता ही कविता ला अटाळी गावात राहणा-या सुरेंद्र पाटील या मांत्रिकाकडे तंत्रमंत्र उपचारासाठी घेवून जात असे. त्यावेळी मांत्रिक पाटील याने त्यांना पंढरीनाथ आणि त्यांची आई चंदुबाई या दोघांच्या अंगात भुत आहे व त्यांच्या अंगातील भुत तंत्रमंत्र करून बाहेर काढावे लागेल असे सांगितले.मांत्रिकाने सांगितल्याने अंधश्रध्देपोटी पंढरीनाथच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आणि पुतण्या विनायक तरे, पुतणी कविता या तिघांनी शनिवारी दुपारी 4.30 वाजता पंढरीनाथ आणि त्याची वयोवृध्द आई चंदुबाई यांच्यावर तंत्रमंत्र करून तसेच त्यांच्या अंगावर हळद टाकून त्यांना काठीने बेदम मारहाण केली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहीती मिळताच पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलिस आयुक्त जे.डी. मोरे यांच्यासह खडकपाडा पोलिस ठाण्यातील अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. यात पंढरीनाथच्या अल्पवयीन मुलासह विनायक तरे (वय 22), कविता तरे (वय 27) यांच्यासह मांत्रिक सुरेंद्र पाटील यालाही ताब्यात घेऊन चौघांवर गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणाचा तपास खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणthaneठाणे