शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

सावधान! तुमचीही होईल फसवणूक; आयकर खातेधारकांचा रिफंड लुटणारी टोळी पूर्ण देशभर सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 21:20 IST

फेक मेसेपासून सावध रहा; महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाकडून नागरिकांना आवाहन 

मुंबई - तुमच्या आयकर रिफंडची रक्कम मंजूर झाली असून  ती तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफरकरण्यासाठी तुमचा बँक खाते क्रमांक आम्हाला पाठवा. खाते क्रमांक चुकीचा असला तर खाली दिलेल्या लिंकला व्हिजीट करा असा एसएमएस तुमच्या मोबाईलवर आला तर सावधगिरी बागळा. कारण आयकर खात्याचे बनावट पेज बनवून संगणकीय प्रणालीने आयकर खातेधारकांचा रिफंड लुटणारी टोळी पूर्ण देशभर सक्रिय झाली असून त्यापासून सावधगिरी बाळगा असे आवाहन  मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने नागरिकांना केले आहे.

आयकर खात्याचे बनावट पेज बनविणारी गुन्हेगार टोळी आयकर धारकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठवून लुटत असल्याचे पोलिसांच्या सायबर सेलने आपल्या इशाऱ्यात म्हटले आहे. आयटी रिटर्न भरण्याची पहिली डेडलाईन संपल्यावर ही टोळी सक्रिय झाली आहे. टोळीचे लुटारू आयकर रिफंडबाबत माहिती मिळवून आयकरधारकांना मोबाईलवर आपला आयकर रिफंड मंजूर झाला आहे. तो तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी तुमच्या बँक खात्याचा तपशील द्या किंवा मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा असे मेसेज पाठवत आहेत. आपण त्या लिंकला भेट दिल्यास आणि लुटारुंच्या सांगण्यानुसार बँक खात्याचा तपशील दिल्यास ते त्या माहितीवरून आपली आयकर रिफंडची  रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून नागरिकांना लुटत असल्याची माहिती  महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाचे प्रमुख बलसिंग राजपूत यांनी दिली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रIncome Taxइन्कम टॅक्सfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइम