शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

सावधान!... मोदींनी देशवासीयांकडे अर्थसहाय्य मागितलं; त्यानं PMCARE नावाचं बनावट खातं बनवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 6:29 PM

खरे खाते पीएमसीएआरएस@ एसबीआय PMCARES@SBI आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान रिलीफ फंडाच्या नावावर बनावट खाते तयार करून फसवणूक केेल्या प्रकरणात एफआयआर नोंदविला आहे. एका S या अक्षरामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. सायबर सेलने सावधगिरीने पैसे दान करण्याचे आवाहन लोकांना केले आहे.

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने पंतप्रधान रिलीफ फंडाच्या नावावर बनावट खाते तयार करून फसवणूक केेल्या प्रकरणात एफआयआर नोंदविला आहे. 

याबाबत माहिती देताना दिल्लीचे पोलीस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव म्हणाले की, पंतप्रधान मदत निधीसाठी यूपीआयआयडी PMCARES@SBI म्हणजे पीएमकेअर्स @एसबीआय आहे, बनावट खाते PMCARE@SBI अर्थात पीएमकेअर@एसबीआय. दोन्ही आयडीमध्ये (S) एसचा फरक आहे. खरा यूपीआय आयडी पीएमकेअर्स आहे तर बनावट पीएमकेअर. पोलीस आयुक्तांनी पुढे सांगितले की, हे बनावट खाते सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे, त्यानंतर सायबर सेलने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या बनावट खाते बंद केले गेले आहे. एका S या अक्षरामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.

 

सायबर सेलने सावधगिरीने पैसे दान करण्याचे आवाहन लोकांना केले आहे. जर आपण काही पैसे दान करत असाल तर लक्षात ठेवा की, खरे खाते पीएमसीएआरएस@ एसबीआय PMCARES@SBI आहे. म्हणून, इतर कोणत्याही यूपीआय आयडीमध्ये पैसे जमा करू नका.

विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी शनिवारी देशातील लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आणि त्यासाठी पीएम सिटीझन असिस्टंट आणि रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन (पीएम-केआरईएस) निधी तयार केला आहे. चित्रपट अभिनेता अक्षय कुमारने या निधीसाठी 25 कोटींची देणगी दिली आहे. यानंतर या निधीसाठी अनेकांनी मदतीचा हात दिला असून काही व्यवसायातून फिल्म इंडस्ट्रीत आणि स्टार्सपासून सर्वसामान्यांना मदत करत आहे. परंतु,भारत सरकारच्या पत्र सूचना माहिती कार्यालयाने सुुचना दिली आहे की, पीएम केअर फंडाच्या नावाखाली अनेक बनावट यूपीआय आयडींकडून देणगी मागितली जात आहे.पीएमबीच्या फॅक्ट चेक टीमने ट्विट केले आहे की, “पीएम केअर फंडाच्या नावावर बनावट यूपीआय आयडी पसरवण्यापासून सावध रहा.” पीआयबी फॅक्ट चेक टीमने ट्वीट केले आहे की, पीएम केअर फंडामध्ये दान करण्यासाठी खरा यूपीआय आयडी pmcares@sbi हा आहे. याशिवाय आपल्याकडे एखादी दुसरी लिंक किंवा मेसेजमध्ये हा आयडी नसेल तर देणगी देऊ नका. पीएम फंडाच्या नावाखाली आपली फसवणूक करण्याचा हा प्रयत्न असू शकतो.

 

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमcorona virusकोरोना वायरस बातम्याTwitterट्विटरNarendra Modiनरेंद्र मोदी