शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या प्रेमात दगा मिळालेली प्रेयसी विकतेय भाजी, ५ वर्ष करून घेतला वापर; वाचा काय आहे भानगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:15 IST

५ वर्ष उलटून गेले तरी डॉक्टरने तिला ना नोकरी दिली ना लग्न केलं. तिला घर खर्चाला पैसे देणंही बंद केलं. आता तिला तिचं आणि मुलाचं पोट भरण्यासाठी भाजी विकावी लागत आहे. 

उत्तर प्रदेशच्या बस्ती मेडिकल कॉलेजमध्ये तैनात डॉक्टर जीडी यादव ५ वर्षाआधी मिर्झापूरच्या साधना सिंहच्या प्रेमात पडला होता. दोघांचं प्रेम इतकं वाढलं की, प्रेयसी सगळं काही सोडून डॉक्टरजवळ आली. डॉक्टरने नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवत तिला फसवलं. ५ वर्ष उलटून गेले तरी डॉक्टरने तिला ना नोकरी दिली ना लग्न केलं. तिला घर खर्चाला पैसे देणंही बंद केलं. आता तिला तिचं आणि मुलाचं पोट भरण्यासाठी भाजी विकावी लागत आहे. 

बस्ती मेडिकल कॉलेजच्या कैली हॉस्पिटलमध्ये तैनात डॉक्टर जीडी यादववर त्याची प्रेयसी साधनाने अत्याचाराचे आरोप लावले आहेत. इतकंच काय तर त्याने तिला खाण्या-पिण्याचं सामान देणंही बंद केलं. ज्यामुळे त्याच्या प्रेयसीला दारोदार भटकावं लागत आहे. आता ती भाजी विकून पोट भरत आहे.

डॉक्टर आणि साधनाचा संपर्क फेसबुकच्या माध्यमातून झाला होता. हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. डॉक्टर प्रेयसीला पहिल्यांदा भेटण्यासाठी मिर्झापूरला गेला होता. त्यानंतर साधना सगळं काही सोडून डॉक्टरकडे कानपूरला रहायला गेली. एक वर्ष दोघे कानपूरमध्ये राहिले. डॉक्टरची बदली बस्तीमध्ये झाली. तेव्हा दोघेही तिथे शिफ्ट झाले आणि मेडिकल कॉलेजच्या सरकारी घरात राहू लागले होते.

आरोप आहे की,  डॉक्टरने आपल्या प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवत फसवलं. त्यानंतर साधनाने जेव्हा डॉक्टरवर लग्नासाठी दबाव टाकला तर त्याने तिला त्रास देणं सुरू केलं. प्रेयसीचा आरोप आहे की, डॉक्टर रोज रात्री दारू पिऊन घरी येत होता. मारहाण करत होता आणि शिव्याही देत होता. घरातील किराणा आणि दूधही बंद केलं. मुलाचा शाळेत प्रवेशही करत नाहीये.

प्रेयसी म्हणाली की, मुलगा डॉक्टरचाच आहे. पण डॉक्टरला हे मान्य नाही. प्रेयसीने सांगितलं की, डॉक्टर दोनदा मुलींना घरी घेऊन आला होता. मी विरोध केला तर मला घरातून जाण्यास सांगितलं. पण सुद्धा माझं घर सोडून त्याच्याकडे आली होती. त्यामुळे मी दुर्लक्ष केलं.

डॉक्टर जीडी यादव  म्हणाला की, फेसबुकच्या माध्यमातून माझा संपर्क झाला होता. जेव्हा तिला समजलं की, मी डॉक्टर आहे तर तिच्या आईला एकदा उपचारासाठी माझ्याकडे घेऊन आली होती. तिने तिची गरिबी आणि परिस्थिती सांगितली. मी तिला घरकामासाठी ठेवून घेतलं. १५ ते २० हजार रूपये महिना तिला पगार देत होतो.

डॉक्टर पुढे म्हणाला की, ही महिला आधीच विवाहित आहे. एका मुलाची आई आहे. तिने मला ब्लॅकमेल करणं सुरू केलं. मी जेव्हा पैसे देण्यास नकार दिला तर मला फसवण्याची धमकी दिली. माझ्या घरावर आणि बेडरूम ताबा मिळवला. तर मी घर सोडून गेलो. डॉक्टर म्हणाला की, माझ्या जीवाला धोका आहे.

तेच पोलीस अधिकारी शक्ती सिंह म्हणाले की, साधना नावाच्या महिलेने आपला प्रियकर जीडी यादव आणि त्याच्या आई विरोधात मारहाणीची तक्रार दिली होती. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची चौकशी केली जात. त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी