शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत फेरफार करणाऱ्या आरोपीचा जामीन दुसऱ्यांदा फेटाळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 20:17 IST

राज्य राखीव पोलीस दलाच्या सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेमध्ये फेरफार करण्यात आला होता

ठळक मुद्दे३ हजार ७३० उमेदवारांनी दिली होती लेखी परीक्षा हा प्रकार २१ आणि २२ एप्रिल रोजी घडला

पुणे : राज्य राखीव पोलीस दलाच्या सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेत आॅप्टीकल मार्क रिकग्नायझेशन (ओएमआर) शिटमध्ये फेरफार केल्याप्रकरणी बावधन येथील ईटीएच लिमिटेडच्या प्रविण दत्तात्रय भाटकर यांचा दुस-यांदा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे.    अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी जामीन फेटाळला. नांदेडनंतर पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या परिक्षेतही गैरप्रकार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानुसार राखीव पोलीस बल गट क्रमांक दोनचे पोलीस निरीक्षक नितीकांत पराडकर (वय ५३) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २१ आणि २२ एप्रिल रोजी हा गुन्हा घडला होता. त्यानंतर भाटकरसह शिरीष बापुसाहेब अवधूत (रा. पिपळेनिलख), स्वप्नील दिलीप साळुंखे (रा. सांगली), भुषण निरंजन देऊलकर आणि तेजस नेमाडे या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस बट क्रमांक २ मध्ये एकूण ८३ सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी १२ मार्च ते २१ एप्रिल या कालावधीत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.    भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षेकरिता आवश्यक असलेल्या ओएमआर (आॅप्टीकल मार्क रिकग्नायझेशन) शिट पुरवणे तसेच तपासणी करण्याचे काम बावधन येथील प्रविण भाटकर याच्या मे. इटीएच लिमिटेड कंपनीकडे देण्यात आले होते. दरम्यान भरती प्रक्रिये कालावधीमध्ये शारिरीक चाचणी, तसेच इतर परिक्षांमध्ये पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा २१ एप्रिल रोजी कवायत मैदानावर घेण्यात आली. ३ हजार ७३० उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली होती. त्यानंतर या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम प्रविण भाटकर आणि इतर चार आरोपींकडे देण्यात आल्या. त्यानंतर त्या दुस-या दिवशी (२२ एप्रिल) रोजी चार वाजता गोपनीय पद्धतीने निकाल दिल्यात आला होता. मात्र उत्तरप्रत्रिका पाहिल्यानंतर याबाबत संशय आला. त्यामुळे याबाबत पोलिसांनी शहानिशा केली असता आरोपींनी २८ उमेदवारांच्या उत्तरप्रत्रिकेत फेरबदल केल्याचे समोर आले. दरम्यान, याप्रकरणी  भाटकरने दुस-यांदा जामीनासाठी अर्ज दाखल केला. भाटकर याने इतर आरोपींबरोबर कट रचून गुन्हा केला असल्याचा सांगत सरकारी पक्षाने अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी केली होती.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय