शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

बहिरेवाडी खून : आई- वडील सतत टोचून बोलायचे म्हणूनच मारले; मुलाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 22:25 IST

अतिशय थंड डोक्याने आई- वडीलांच्यावर हल्ला  केल्यानंतर सचिन हा दरवाजांना आतून कडी लावून  घरातील माळ्यावर झोपला होता.

- रवींद्र येसादे लोकमत न्यूज नेटवर्क  भादवण ( जि.कोल्हापूर) :'काही काम धंदा करत नाहीस, नुसतं बसून खातोस 'असं आई-वडील सतत टोचून बोलायचे,त्याच रागातुन त्यांना खुरप्यानं मारलं,अशी कबुली बहिरेवाडी खून प्रकरणातील  संशयित आरोपी सचिन गोरूले यांने शुक्रवारी (१०) रात्री पोलीसांना घटनास्थळीच दिली.त्यामुळे पोलीसांनी त्याला अटक केली.आजरा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

     अधिक माहिती अशी, शुक्रवारी (१०) सायंकाळी बहिरेवाडी येथील वयोवृद्ध  शेतकरी कृष्णा बाबू गोरूले( वय ७०) व त्यांच्या पत्नी पारूबाई(वय ६५) यांच्यावर मुलगा सचिन ऊर्फ पप्पू यांने खुरप्याने जीवघेणा हल्ला केला.त्यात कृष्णा यांचा जागीच मृत्यू झाला.पारुबाई या अत्यवस्थ असून त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.त्यांच्या पश्चात आरोपी सचिन, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

      अतिशय थंड डोक्याने आई- वडीलांच्यावर हल्ला  केल्यानंतर सचिन हा दरवाजांना आतून कडी लावून  घरातील माळ्यावर झोपला होता.पोलीसांनी रात्री उशिरात्याला अटक केली होती.शनिवारी न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली.    मृत  कृष्णा यांचा चुलत नातू ऋतिक घुणके (रा. कोल्हापूर) यांच्या फिर्यादीवरून आजरा पोलिसात सचिनविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे अधिक तपास करीत आहेत .

खुरप्याचा वार बसले वर्मी ! रागाच्या भरात सचिन यांने पहिल्यांदा आई पारुबाई यांच्या कपाळावर व मानेवर खुरप्याने वार केले.त्यामुळे जीव वाचवण्यासाठी त्या घरातून पळत बाहेर आल्या.त्यानंतर त्यांने घराचे दरवाजे आतून बंद करून वडील कृष्णा यांच्या चेहऱ्यावर व गळ्यावर वार केले.खुरप्याचा वार वर्मी लागून कृष्णा हे जागीच ठार झाले तर पारुबाई हया आई गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यांची प्रकृती गंभीर आहे

  अंत्यसंस्काला येण्याची वेळ मृताची विवाहित मुलगीबेलेवाडीत राहते.माहेरच्या लक्ष्मी यात्रेसाठी ती शुक्रवारी संध्याकाळी बहिरेवाडीला येणार होती.परंतु,यात्रेऐवजी वडिलांच्या अंत्यसंस्काराला येण्याची वेळ तिच्यावर आली.  शनिवारी दुपारी मृत कृष्णा यांच्यावर बहिरेवाडी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी