शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

टपाल कार्यालयातून पैशांची पिशवी चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 02:52 IST

मुंबई : चेंबूरच्या पोस्ट कार्यालयाच्या काउंटरबाहेरून ७० वर्षीय गोप रामचंद दयानी यांची पैशांची कापडी पिशवी चोरीला गेली आहे. त्या ...

मुंबई : चेंबूरच्या पोस्ट कार्यालयाच्या काउंटरबाहेरून ७० वर्षीय गोप रामचंद दयानी यांची पैशांची कापडी पिशवी चोरीला गेली आहे. त्या पिशवीत ५२ हजार रुपये होते. कोरोनामुळे आधीच उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत असताना, या चोरीमुळे त्यांना धक्का बसला आहे. या प्रकरणी चेंबूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.चेंबूर परिसरात पत्नी, मुलगा, सुनेसोबत राहणारे दयानी पोस्ट कार्यालयात दलाल म्हणून काम करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून घरखर्च भागवतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी सकाळी १० वाजता ते नेहमीप्रमाणे चेंबूरच्या पोस्ट कार्यालयात गेले. त्यांच्याकडे असलेल्या कमिशनसह ग्राहकांचे असे एकूण ९२ हजार रुपये होते. यातील ४५ हजार त्यांनी ग्राहकांना दिले. ४७ हजार रुपये पिशवीत होते. याच दरम्यान दुपारी १२ च्या सुमारास पोस्ट कार्यालयात संगणक दुरुस्तीसाठी आलेल्या व्यक्तीला चार्जर हवा असल्याने त्यांनी पैशांची पिशवी तेथेच ठेवून, शेजारीच असलेल्या घरी चार्जर आणायला गेले. चार्जर घेऊन परत आले तेव्हा पोस्ट कार्यालयातील काउंटरवर बाहेरच्या बाजूला ठेवलेली पिशवी दिसून आली नाही. त्यांनी सगळीकडे शोध घेतला; मात्र पिशवी मिळाली नाही. या प्रकारामुळे कार्यालयात खळबळ उडाली. अखेर, संध्याकाळी त्यांनी चेंबूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.सीसीटीव्हीमध्ये दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसून येत असल्याचे दयानी यांनी नमूद केले. तसेच यात त्यांची महत्त्वाची कागदपत्रेदेखील चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले.कमिशनचे होते पैसेचेंबूर परिसरात पत्नी, मुलगा, सुनेसोबत राहणारे दयानी पोस्ट कार्यालयात दलाल म्हणून काम करतात.गुरुवारी सकाळी १० वाजता ते नेहमीप्रमाणे चेंबूरच्या पोस्ट कार्यालयात गेले. त्यांच्याकडे असलेल्या कमिशनसह ग्राहकांचे असे एकूण ९२ हजार रुपये होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई