शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 06:33 IST

शाळेमधील सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आले आहे. तरीही शाळेवर पुरावे नष्ट केल्यासंदर्भात कारवाई करण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींना अद्याप ताब्यात न घेण्यात आल्याने उच्च न्यायालयाने विशेष तपास पथकावर (एसआयटी) ताशेरे ओढले. तसेच, गुन्हेगारांच्या हितापेक्षा मुलांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने मंगळवारी शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली.

आरोपींना शोधण्यासाठी पोलिस देशातील सर्व राज्यांत तपास करतात. पण, या प्रकरणात तुम्ही शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांचा शोध लावू शकला नाहीत? तुम्ही आरोपींना अटकपूर्व जामीनाची वाट पाहात आहात का, असा प्रश्न न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांना केला.

खंडपीठाने विचारलेल्या या प्रश्नावर सराफ यांनी आक्षेप घेतला. हे अयोग्य आहे, असे सराफ यांनी म्हटले. त्यावर, दोन आरोपी फरारी आहेत, हे सांगितल्यावरच तुम्हाला असे प्रश्न विचारले जाणे अपेक्षित आहे, असे न्यायालयाने त्यांना म्हटले. आम्ही कोणालाही त्यांच्या राजकीय भाषणात आमचा वापर करू देणार नाही. आम्ही येथे फक्त न्याय देण्यासाठी आहोत, असेही न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी सुनावले. एसआयटीने  मुख्याध्यापक, शाळेचे अध्यक्ष व सचिवांवर आरोपपत्र दाखल केले आहे, अशी माहिती सराफ यांनी दिली. पुढील सुनावणी २३ ऑक्टोबर रोजी होईल.

फरारी आरोपी आणि अक्षय शिंदेमध्ये भेदभावशाळेमधील सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आले आहे. तरीही शाळेवर पुरावे नष्ट केल्यासंदर्भात कारवाई करण्यात आली नाही. मोठ्या माशांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. फरारी दोन्ही आरोपी आणि अक्षय शिंदे यांच्याबाबत भेदभाव करण्यात येत आहे, असा आरोप अक्षय शिंदेच्या वकिलांनी केला.

मुली अद्यापही शाळेत जात नाहीतबदलापूर प्रकरणातील पीडित मुली अद्यापही शाळेत जाऊ शकत नाहीत.  ज्यांच्यावर विश्वास ठेवून तक्रार केली, त्यांनी मदत केली नाही. आता शाळा व्यवस्थापनातील आरोपीही फरारी आहेत. त्यामुळे मुली शाळेत जाऊ शकल्या नाहीत, असा युक्तिवाद मुलींच्या वतीने ॲड. कविश खन्ना यांनी न्यायालयात केला.

टॅग्स :badlapurबदलापूरHigh Courtउच्च न्यायालय