शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 14:02 IST

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी हरियाणातील कैथल येथून एका तरुणाला अटक केली.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी हरियाणातील कैथल येथून एका तरुणाला अटक केली. अमित कुमार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो कलयातच्या बाता गावचा रहिवासी आहे. झिशान अख्तरला भाड्याने घर मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप अमितवर आहे. यापूर्वी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी कैथलच्या गुरमेलला घटनास्थळावरून अटक करण्यात आली होती.

अख्तरने १५ महिन्यांपूर्वी जेलमध्ये या दोन जणांना आपला मित्र बनवलं होतं, असं सांगितलं जात आहे. कैथलच्या कलायत शहरात एका आरोपीवर गोळीबार केल्याप्रकरणी शस्त्र पुरवल्याच्या आरोपावरून कैथल पोलिसांनी झिशान अख्तरला पंजाबच्या कपूरथला जेलमधून आणलं होतं. 

मुंबई गुन्हे शाखेने त्यांच्या मुलाला घरातून अटक केल्याचं अमितच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. आमच्या मुलाच्या मोबाईलमध्ये त्याच्यासोबत एका मुलाचा फोटो सापडल्याचं पोलिसांनी आम्हाला सांगितलं आहे. पोलिसांनी आमच्या मुलाचा मोबाईलही काढून घेतला आहे अशीही माहिती दिली. बारावी पास अमितचे आई-वडील दोघेही मजुरीचं काम करतात आणि अमित दारूच्या दुकानात काम करायचा.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलीस सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत आता आणखी एक मोठी बाब समोर आली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली आहे की, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्याआधी शूटर्सनी कर्जत खोपोली रोडवरील जंगलात पिस्तुलाने गोळीबार करण्याचा सराव केला होता. 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCrime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbai policeमुंबई पोलीस