शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 13:32 IST

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलीस सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलीस सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत आता आणखी एक मोठी बाब समोर आली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली आहे की, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्याआधी शूटर्सनी कर्जत खोपोली रोडवरील जंगलात पिस्तुलाने गोळीबार करण्याचा सराव केला होता.

आरोपी गुरमेल सिंह, धर्मराज कश्यप आणि फरार आरोपी शिवकुमार गौतम यांनी सप्टेंबर महिन्यात जंगलात जाऊन गोळीबार करण्याचा सराव केला आणि त्यानंतर दसऱ्याच्या रात्री बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला केला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी झाडावर गोळी चालवण्याचा सराव केला होता. कर्जत खोपोली रोडवर असलेल्या धबधब्याजवळील पळसदरी गावातील जंगलात हा सराव करण्यात आला.

आरोपींनी सराव करायला जाण्यासाठी कुर्ला स्टेशन ते लौजी रेल्वे स्टेशनपर्यंत ट्रेनने प्रवास केला हे चौकशीदरम्यान समोर आले आहे. तिथून रिक्षा पकडून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसदरी गावात पोहोचले. आरोपींनी स्टेशनवरून रिक्षा केली आणि आम्ही इथे फिरायला आलो आहोत असं सांगितलं. त्यामुळे कोणत्यातरी ठिकाणी आम्हाला घेऊन चल असं रिक्षा चालकाला सांगितलं. रिक्षा चालक आधी ज्या ठिकाणी घेऊन गेला तिथे लोकांची खूप गर्दी होती. 

आरोपींनी यानंतर रिक्षा चालकाला डोंगर आणि घनदाट जंगल असलेल्या ठिकाणी नेण्यास सांगितलं, असा दावाही सूत्रांनी केला आहे. यानंतर चालकाने त्यांना पळसदरी गावाजवळील धबधब्याजवळ नेलं. धबधब्याच्या आवाजामुळे गोळीबाराचा आवाज कमी प्रमाणात येण्यास मदत होईल, असा अंदाज आरोपींचा होता. यानंतर आरोपींनी त्या जंगलात जाऊन झाडावर ५-१० राउंड फायरिंग करून गोळीबाराचा सराव केला.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचं समोर आलं नाव

गोळीबार करणारे हे लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळेच बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँगचाच हात असल्याची खात्री आता अधिकाऱ्यांना झाली आहे. मात्र, हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अभिनेता सलमान खानशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे सिद्दिकी यांची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे. अनमोल बिश्नोई हा शूटर आणि कट रचणारा प्रवीण लोणकर यांच्या संपर्कात असल्याचं डिजिटल पुराव्यांवरून समोर आलं आहे. 

 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCrime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbai policeमुंबई पोलीस