शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

12वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या बीए पास पत्नीने केली आत्महत्या, 5 महिन्यांआधीच झालं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 12:14 IST

Rajasthan : महिला रक्षाबंधनासाठी माहेरी गेली होती. तीन दिवसांनी परत आल्यावर तिने आत्महत्या केली. सूनेचा मृतदेह लटकलेला पाहून सासरच्या लोकांना चांगला धक्का बसला.

राजस्थानच्या (Rajasthan) बांसवाडा जिल्ह्यात एक नव्या नवरीच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. महिलेने रक्षाबंधनाच्या तीन दिवसांनंतर आपल्या सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणारी महिला तिच्या पतीपेक्षा तीन वर्षांनी मोठी होती. महिला बीए पास होती तर तिचा पती अजूनही 12 सायन्सचा विद्यार्थी आहे. महिला रक्षाबंधनासाठी माहेरी गेली होती. तीन दिवसांनी परत आल्यावर तिने आत्महत्या केली. सूनेचा मृतदेह लटकलेला पाहून सासरच्या लोकांना चांगला धक्का बसला.

पोलिसांनुसार, ही घटना बांसवाडा जिल्ह्याच्या भूंगडा भागातील आहे. पोलिसांनी सांगितलं की, 22 वर्षीय नीमाचं लग्न 5 महिन्यांआधी गणेशलाल चरपोटासोबत झालं होतं. लग्नानंतर दोघेही आनंदाने संसार करत होते. राखीच्या दिवशी दोघेही महिलेच्या माहेरी घाटोलला गेले होते. रक्षाबंधन करून पती-पत्नी दोघेही घरी परत आले.

महिलेच्या गावाहून परत आल्यावर पती गणेशलाल शेतात गेला होता. तेव्हाच महिला नीमाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनेची सूचना शनिवारी रात्री 8 वाजता देण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून महिलेचा मृतदेह खाली काढला. त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. 

प्राथमिक तपासातून समोर आलं की, घटनेवेळी महिलेचा पती शेतात गेला होता आणि सासू-सासरेही घरात नव्हते. सासरच्या लोकांनी सांगितलं की, महिलेने घराचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. पण महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या हत्येचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी दोन्ही पक्षांचे जबाब घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आत्महत्येचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी