शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरीण बनून घराघरात जायची, संधी मिळताच घर सुपडासाफ करायची! BA पास महिलेचे कारनामे ऐकून सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:18 IST

ही महिला आधी घरांमध्ये मोलकरीण म्हणून काम करायची आणि संधी मिळताच हात साफ करून पसार व्हायची.

नोएडा पोलिसांनी एका धक्कादायक प्रकरणात सुशिक्षित महिलेला अटक केली आहे, जी आधी घरांमध्ये मोलकरीण म्हणून काम करायची आणि संधी मिळताच हात साफ करून पसार व्हायची. मात्र, यावेळी एका घरातून चोरी करून पळून गेल्यानंतर पोलिसांनी तिला दागिने विकताना रंगेहाथ पकडले. चौकशीदरम्यान, आरोपी महिलेने आपण बीए पास असल्याचे कबूल केले आहे. ती घरांमध्ये मोलकरीण म्हणून जायची आणि संधी मिळताच चोरी करून पळून जायची, असे तिने सांगितले.

ही घटना नोएडाच्या सेक्टर ७१ मधून समोर आली आहे. बिहारमधील मधुबनी येथील रहिवासी असलेली आरोपी महिला जूली हिला पोलिसांनी अटक केली आहे. तिने नुकतेच प्रतिभा सिंह नावाच्या महिलेच्या घरी मोलकरीण म्हणून काम सुरू केले होते. प्रतिभा त्यांच्या पतीच्या व्यवसायामुळे बहुतेक वेळ परदेशात जात असत. त्यांच्या घरात आधीपासून सुनीता नावाची एक महिला मोलकरीण म्हणून काम करत होती.

सोन्याची चेन आणि कानातले घेऊन पसारकाही दिवसांपूर्वीच प्रतिभा यांच्या मुलीची डिलिव्हरी झाली होती, त्यासाठी त्यांनी जूलीला कामावर ठेवले होते. मात्र, जूलीने तीन दिवसांपूर्वी, म्हणजेच ६ जुलै रोजी, घरातून एक सोन्याची चेन आणि सोन्याचे कुंडल चोरले. याबाबत मालकीण प्रतिभा सिंह यांनी जूलीला विचारले असता, तिने टाळाटाळ केली आणि त्यानंतर आपला मोबाईलही बंद केला. तेव्हापासून जूली कामावरही आली नाही.

दागिने विकताना पोलिसांच्या जाळ्यातप्रतिभा सिंह यांनी सुनीताला या प्रकरणाबद्दल सांगितले. सुनीताने जूलीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेचा शोध सुरू केला. पोलिसांनी शोध सुरू केला असता, ती महिला सेक्टर ७१मध्ये चोरीचे दागिने विकत होती. त्याचवेळी पोलिसांनी तिला अटक केली. महिलेने चौकशीत आपला गुन्हा कबूल करत संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आणि आपण बीए पास असल्याचे देखील सांगितले. आता पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीDelhi Gateदिल्ली गेट