अयोध्येच्या मुरावन टोला येथे एका नवं दाम्पत्याने लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर कुटुंबासोबत आनंदाचे क्षण एन्जॉय केले. घरात सर्वांनाच लग्नामुळे फार छान वाटत होतं. शनिवारी रात्री लग्न झाल्यानंतर सर्व नातेवाईक विश्रांती घेत असताना, नवविवाहित जोडपं त्यांच्या खोलीत गेलं. सकाळ झाली पण दार उघडलं नाही. तेव्हा कुटुंबाला काहीतरी अनुचित घडल्याची भीती वाटती. जेव्हा दरवाजा तोडला गेला तेव्हा जे दृश्य दिसले त्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
वधू शिवानीचा मृतदेह बेडवर पडला होता आणि वर प्रदीप पंख्याला लटकत होता. एका रात्रीत काय घडलं? असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीपने आधी पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर स्वतःला गळफास लावून घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी बराच वेळ दरवाजा उघडला नाही तेव्हा खिडकीची ग्रिल तोडून आत प्रवेश केल्याचं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. नवरा-नवरी दोघेही मृतावस्थेत पडले होते.
कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सएप चॅटिंग
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दोन्ही कुटुंबांशी बोलले आहेत. दरवाजा आतून बंद होता. अशा परिस्थितीत तिसरा कोणी खोलीत असण्याची शक्यता खूपच कमी आहे. इतर ज्या काही गोष्टी आहेत, त्यांची चौकशी केली जात आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, मोबाईल कॉल डिटेल्स, व्हॉट्सअॅप चॅटिंग, मेसेजेस इत्यादींची तपासणी केली जात आहे. यातून काही क्लू मिळण्याची शक्यता आहे. रहस्य उलगडणार आहे.
७ मार्च रोजी झालं लग्न
७ मार्च रोजी लग्न झालं.सर्वजण खूप आनंदात होतं. लग्नही नीट पार पडलं. नवरा-नवरी दोघंही खूश होते. आपापसात गप्पा मारत होते. दोघांच्या संमतीनेच हे लग्न ठरलं होतं. पण असं नेमकं काय झालं हे समजत नाही असं नातेवाईकांनी म्हटलं आहे. मुलाच्या मोठ्या भावाने सांगितलं की, रविवारी रिसेप्शन होतं. ज्याची जोरदार तयारी सुरू होती. मी कुटुंबातील काही इतर सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत भाज्या खरेदी करण्यासाठी गेलो होतो. मी भाज्या खरेदी करत असताना मला घरून फोन आला. कुटुंबातील सदस्यांनी लवकर घरी येण्यास सांगितलं. मी घरी पोहोचलो तेव्हा कुटुंबातील सर्वजण रडत होते.