शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Ayesha Suicide Case Ahmedabad: 'शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावरच प्रेम...' आयशा आत्महत्या प्रकरणात पतीला 10 वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 15:52 IST

Ayesha Suicide Case Ahmedabad: गेल्या वर्षी देशभरात गाजलेल्या अहमदाबादच्या आयशा आत्महत्या प्रकरणात पतीला 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Ayesha Suicide Case Ahmedabad: देशभर गाजलेल्या गुजरातच्या आयशा आत्महत्या प्रकरणी कोर्टाने आरोपी पतीला शिक्षा सुनावली आहे. गेल्यावर्षी 23 वर्षीय आयशाने साबरमती नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ शूट करुन कुटुंबियांना पाठवला होता. हा व्हिडिओ केवळ गुजरातच नव्हे, तर देशभरात व्हायरल झाला होता. 

आरोपी पतीला 10 वर्षांची शिक्षाआयशा आत्महत्या प्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद सत्र न्यायालयाने पती आरिफला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आयशाने 25 फेब्रुवारी 2021 रोजी साबरमती नदीत उडी मारुन आत्महत्या केली होती. त्या घटनेनंतर पती राजस्थानमध्ये पळून गेला होता. 1 मार्च रोजी त्याला पाली येथून अटक करण्यात आलो होती. त्याला आता न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

नेमकं काय झालं होतं?मूळची राजस्थानची असलेली आयशा लग्नानंतर तिच्या पतीसोबत अहमदाबादच्या वाटवा येथे राहत होती. 23 वर्षीय आयशाचा विवाह 2018 मध्ये राजस्थानमधील जालोर येथील आरिफसोबत झाला होता. आरिफचे राजस्थानमधील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. आयशासमोर आरिफ प्रेयसीशी व्हिडिओ कॉलवर बोलत असे. यामुळे गरोदरपणात आरिफच्या वागण्याने आयशा तुटली होती. ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तिचे मूलही गर्भातच मरण पावले. दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असत. रोजच्या भांडणाला कंटाळून तिने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.

व्हिडिओ व्हायरलसाबरमती नदीत उडी मारण्यापूर्वी आयशाने एक व्हिडिओ आपल्या कुटुंबीयांना पाठवला होता. तो व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला. त्या व्हिडिओत आयशा म्हणाली होती, "आरीफ आय लव्ह यू. मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहीन. ही सुंदर नदी तिच्या मला मिठीत घेईल, अशी मी प्रार्थना करते.'' आयेशाच्या मृत्यूनंतर हे प्रकरण हुंड्यासाठी छळाचे असल्याचे निष्पन्न झाले होते. 

टॅग्स :GujaratगुजरातahmedabadअहमदाबादPoliceपोलिसCourtन्यायालय